शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:50 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे निकाल एनडीएच्या लोकाभिमुख धोरणांवर जनतेचा विश्वास दर्शवणारे आहेत. महाराष्ट्रात महायुती आघाडीला मिळालेले नेत्रदीपक यश आणि झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे यश, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुका, तसेच इतर राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जनतेचे आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे निकाल एनडीएच्या लोकाभिमुख धोरणांवर जनतेचा विश्वास दर्शवणारे आहेत. महाराष्ट्रात महायुती आघाडीला मिळालेले नेत्रदीपक यश आणि झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे यश, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विकास... सुशासन... जय महाराष्ट्र...!महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला आहे. या विजायासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत, महाराष्ट्रातील जनतेचे, विशेषतः तरुण वर्गाचे आणि महिलांचे, या ऐतिहासिक विजयासाठी आभार मानले आहेत. एवढेच नाही, तर मी ग्वाही देतो की,  महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची युती सातत्याने काम करत राहील. जय महाराष्ट्र!

बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>

झारखंडच्या जनतेचे आभार - झारखंड विधानसभेचेही चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. येथे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी 40 पेक्षाही अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर NDA 30 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. झारखंडच्या जनतेचे आभार मानत पीएम मोदींनी ट्विट केले की, "राज्यातील जनतेच्या समस्या उचलण्यासाठी आणि त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही सदैव अग्रेसर राहू." याच बरोबर, पंतप्रधान मोदी यांनी हेमंत सोरेन आणि त्यांच्या पक्षाचेही त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

एनडीएची कामगिरी आणि जनतेचा विश्वास -पोटनिवडणुकीसंदर्भात ट्विट करत त्यांनी लिहिले, "एनडीएच्या लोकाभिमुख योजनाची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. लोकांची स्वप्ने आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात आम्ही कुठलीही कसर सोडणार नाही." 

उत्तर प्रदेशातील नऊ विधानसभा जागांपैकी सात जागांवर आघाडी घेत भाजपने विरोधकांना कडवी टक्कर दिली आहे. तसेच, इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही एनडीएची कामगिरी प्रभावी ठरली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Narendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुतीjharkhand assembly election 2024झारखंड विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा