शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Vidhan sabha 2019 : भाजप उमेदवारांची नावे अखेर निश्चित, २०% आमदारांना मिळणार नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 06:55 IST

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत या नावांची घोषणा केव्हाही केली जाऊ शकते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार पक्षाने निश्चित केले आहेत. काही जागांचा निर्णय व्हायचा आहे. जवळपास २० टक्के जागांवरील विद्यमान आमदारांना बदलण्याचा निर्णय झालेला आहे. या जागांवर त्याला आपल्याच नेत्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागू शकते. अशा जागांवरील उमेदवारांची नावे उशिरा जाहीर केली जाऊ शकतात. या बैठकीत शिवसेनेसोबच्या जागा वाटपावरही चर्चा झाली. उच्चपदस्थ सूत्रांनुसार भाजपची वरिष्ठ समिती शिवसेनेसाठी फक्त १२४ जागा सोडायला तयार आहे आणि स्वत: भाजप छोट्या मित्रपक्षांसह १६४ जागा लढेल.भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पाच वाजता सुरु झाली. या बैठकीत प्रथम हरयाणाच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर रात्री ८ वाजता महाराष्ट्राबाबत चर्चा झाली. या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन महामंत्री बी. एल. संतोष, महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह शाहनवाज हुसैन, नरेंद्र सिंह तोमर आणि अनिल जैन हे सहभागी झाले होते.भाजपसाठी खास आहेत निवडणुकाअमित शहा यांनी यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी राज्याच्या कोअर कमिटी सदस्यांसोबत उमेदवारांच्या नावांबाबत आणि सहयोगी पक्षासोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा केली होती. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिला विधानसभा निवडणूक आहे. भाजपसाठी ही निवडणूक यासाठीही खास आहे कारण, दोन्ही राज्यात प्रथमच सत्ता भाजपकडे आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर आहे. मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी आहे.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019