शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सदन पुन्हा वादात, यंदा गणेशोत्सव नाही?

By admin | Updated: August 4, 2014 14:39 IST

महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यांनी सदनात गणेशोत्सव साजरा न करण्याचा फतवा काढल्याने नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ -  महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळालेली दुय्यम वागणूक, निकृष्ट भोजन व त्यानंतर मुस्लीम कर्मचा-याला चपाती भरवण्यावरून झालेला गोंधळ, या सर्व घटना अद्याप ताज्या असतानाचा महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा चर्चैत आले आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यांनी यंदा महाराष्ट्र सदनाता गणेशोत्सव साजरा न करण्याचा फतवा काढल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. 
महाराष्ट्र सदनात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाता साजरा होतो, त्यानिमित्ताने दिल्लीतील सर्व मराठी बांधव एकत्र येतात. मात्र बिपिन मलिक यांचा या उत्सवाला विरोध असून गेल्या २-३ वर्षापांसून त्यांनी गणेशोत्सव बंद करावा, असा धोशा लावला आहे. यावर्षी त्यांनी गणेशोत्सवासाठी जागा देणेही नाकारले असून सदनात 'बाप्पाची' प्रतिष्ठापना करण्यास, पूजा करण्यास मनाई करत हा उत्सव साजरा न करण्याचा फतवा काढला आहे. 'राज्य शासनाचा सदनात साज-या होणा-या गणेशोत्सवाशी काहीही संबंध नाही. राज्य शासन यात सहभागी होत नाही, त्यामुळे यावर्षी सदनात उत्सव साजरा होईल की नाही हे आपल्याला माहीत नाही', असे मलिक यांनी सांगितल्याचे समजते. 
दिल्लीत १९९७ सालापासून गणेशोत्सव साजरा होतो. सदनातील अनेक कर्मचारी कठोर परिश्रम करून हा उत्सव उत्साहात साजरा करत असत. मात्र आता मलिक यांच्या या भूमिकेमुळे अनेक वर्षापांसून सुरू असलेली गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.