शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या निकालाने देशातील राजकारण बदलेल, वातावरण काँग्रेसच्या बाजूने: सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 05:36 IST

सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:  महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. मात्र, अतिआत्मविश्वास न ठेवता आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल. लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि भावना आपल्याला कायम ठेवायच्या आहेत, असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षाच्या नेत्यांना सांगितले.

सोनिया गांधी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून धडा घेण्याऐवजी मोदी सरकार अजूनही समुदायांमध्ये फूट पाडत असून, भीती आणि शत्रुत्व पसरवत आहे. जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदार उपस्थित होते.

गांधी म्हणाल्या...

जनगणना करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही.आमचे किमान १२ कोटी नागरिक  राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या लाभांपासून वंचित आहेत.काही आठवड्यांत किमान ११ दहशतवादी हल्ले ही अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी.जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही ठीक असल्याचा दावा हास्यास्पद.मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत.

नियम का बदलले?

उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावर दुकानदारांची नावे लावण्याचा निर्णय का घेण्यात आला? सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळी हस्तक्षेप केला; परंतु तो केवळ तात्पुरता दिलासा असू शकतो. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी नियम अचानक बदलण्यात आले, असा दावा त्यांनी केला. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे