शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
4
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
5
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
6
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
7
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
8
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
9
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
10
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
11
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
12
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
13
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
14
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
15
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
16
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
17
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
18
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
19
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
20
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी का उचलतायेत टोकाचं पाऊल?; दुर्दैवाने देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:47 IST

दहावी व बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक 

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली - शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगभरात ओळख असलेला महाराष्ट्र विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे आली आहे. शाळा, शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे देशात विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील दहावीचा विद्यार्थी शौर्य पाटील आणि जालन्यातील आरोही बिटलानसह कितीतरी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनांमुळे देश ढवळून निघाला आहे. 

राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अपघात व आत्महत्येशी संबंधित अहवालानुसार, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये देशात एकूण १३,८९२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यातील सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यातील २,०४६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. 

आत्महत्येची कारणे मित्रांपुढे अपमान, खच्चीकरण करणे, नापास करणे आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी, पालकांना उलटसुलट बोलणे, दुसऱ्या विद्यार्थ्याशी तुलना करणे, ड्रामेबाज म्हणणे, मासिक फी, वार्षिक फी, स्पोर्ट्स डे किंवा अन्य कार्यक्रमाचे पैसे न भरल्यास  इतरांपेक्षा वेगळे दाखविणे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०१४ ते २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण ७२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०१५ मध्ये आत्महत्यांचा आकडा ९०० ते २०२० मध्ये २,१०० ने आणि २,०२३ मध्ये ८४८ ने वाढला होता.

देशातही प्रमाण वाढले देशात २०१८ मध्ये एकूण १,३४,५१६ जणांनी आत्महत्या केली. २०२३ मध्ये हा आकडा १,७१,४१८ वर पोहोचला. यात मुंबईत (१,४१५), पुणे (९५३), नागपूर (६६३), छ. संभाजीनगर (३५४) व नाशिकमध्ये (१६०) घटना घडल्या आहेत.

उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांची टक्केवारी १७.५ टक्के या आकडेवारीतील धक्कादायक बाब अशी की, आत्महत्या करण्यात दहावी आणि बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक २४.६ टक्के आहे. यानंतर फस्ट ईअर ते थर्ड ईअरच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १८.६ टक्के, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांची टक्केवारी १७.५ टक्के अशी आहे. विद्यार्थी आत्महत्यांना आळा घालण्यासाठी मेंटल हेल्थकेअर ॲक्ट, एन्ट्री रॅगिंग मेजर्स, असे विविध कायदे अस्तित्वात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra leads in student suicides; alarming rise in India.

Web Summary : Maharashtra tops India in student suicides, with 2,046 deaths in 2023. Humiliation, academic pressure, and financial issues are key factors. Suicides increased 72% from 2014-2023, with high school students most vulnerable. National data shows a concerning rise in overall suicides too.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र