देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव असतानाच आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राजकीय नेत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीही टीका करत नाराजी दर्शवली होती. कुंभमेळ्यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे."कुंभ मेळ्याचं आयोजन दर १२ वर्षांनंतर केलं जातं. यानुसार कुंभ मेळा २०२२ मध्ये आयोजित झाला पाहिजे होता. असं असताना केंद्र आणि राज्य सरकारनं २०२१ मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्याची परवानगी कशी दिली? आता त्यांनी मृत्यूंची आणि कोरोनाचा प्रसार झाल्याची जबाबदारी स्वीकारावी," असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रश्न उपस्थितीत केला आहे.
... मग २०२२ मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याला २०२१ मध्ये सरकारनं परवानगी का दिली?; आव्हाडांनी उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 14:13 IST
Kumbhmela : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला प्रश्न
... मग २०२२ मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याला २०२१ मध्ये सरकारनं परवानगी का दिली?; आव्हाडांनी उपस्थित केला प्रश्न
ठळक मुद्देराज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला प्रश्नयापर्वी अनेकांनी यावर टीका करत व्यक्त केली होती नाराजी