शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; सत्यपाल सिंह यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 15:31 IST

पीएचडीची पदवी घेतलेल्या अनेकांना पीएचडी शब्दाचा लाँगफॉर्मही सांगता येत नाही. त्या त्या विषयाचे व्यवस्थित आणि सविस्तर ज्ञान नसताना देखील पदवी घेऊन बसले आहेत.

रेनिगुंठा, (आंध्र प्रदेश) : पीएचडीची पदवी घेणाऱ्या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी अशीच बोगस आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरुवारी जाहीर भाषणात केला. त्यामुळे आता ते मंत्री नेमके कोण, याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आंध्र प्रदेशातील तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात आलेल्या 'फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग'चे उदघाटन डॉ. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ‌डॉ. सिंग म्हणाले, 'पीएचडीची पदवी घेतलेल्या अनेकांना पीएचडी शब्दाचा लाँगफॉर्मही सांगता येत नाही. त्या त्या विषयाचे व्यवस्थित आणि सविस्तर ज्ञान नसताना देखील पदवी घेऊन बसले आहेत. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांने अशाच प्रकारे बोगस पीएचडी पदवी मिळवली आहे. त्या मंत्र्याने मला त्यांनी पीएचडी केलेल्या विषयाची माहिती दिली होती. मात्र, तो विषय इथे सांगण्यालायकदेखील नाही." त्या मंत्र्याने ज्या विद्यापीठातून ही पदवी मिळवली होती. तिथल्या संबधित विभागाच्या प्रमुखांना मी फोन केला. या विषयात पीएचडी करण्यास तुम्ही मान्यताच कशी दिली, अशी विचारणा मी त्यांना केली होती. तेव्हा वरिष्ठ पातळीवरून त्या विषयाला मान्यता आणि त्याचबरोबर पदवी देण्यास माझ्यावर दबाव आल्याचे त्यांनी सांगितले, अशी धक्कादायक माहिती सत्यपाल सिंह यांनी दिली. केवळ महाराष्ट्र नाही तर उत्तर प्रदेशात देखील असे प्रकार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर तो मंत्री कोण याबाबत डॉ. सत्यपाल सिंह यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र माझे नाव 'सत्य'पाल आहे', असे म्हणून मी जे बोलतो ते खरंच बोलतो, असा  निर्वाळा त्यांनी दिला. 

डार्विनबाबतच्या विधानामुळे चर्चेला सुरुवात‌डार्विन यांच्या सिध्दांताबाबत सत्यपाल सिंह यांनी केलेल्या विधानामुळे देशभर प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, "मी माझे वैयक्तिक मत मांडले होते. मी देखील विज्ञानाचा विद्यार्थी होतो आणि आहे. विज्ञान हे विविध प्रकारच्या चर्चा आणि विरोधातून वाढते. माझ्या विधानामुळे या विषयावरील चर्चेला तोंड फुटले. असे मत मांडणार मी पहिला नाही. यापूर्वीही अनेकांनी असे मत व्यक्त केले आहे. मी केलेल्या विधानानंतर मात्र त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली. काही ठिकाणी परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने चर्चेला सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे, असे सत्यपाल सिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगBJPभाजपा