शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देशात महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी, राज्यावर आहे एवढं कर्ज, धक्कादायक आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:23 IST

Maharashtra Economy News: राज्यशकट चालविण्यासाठी सरकार जनतेकडून विविध प्रकारचे कर आकारत असते. या कर संकलनातून राज्य सरकारची तिजोरी भरते. हाच पैसा कल्याणकारी योजनांसाठी राबवला जातो. मात्र, खर्च भागविण्यासाठी राज्यांना कर्जेही घ्यावी लागतात.

- हरीश गुप्ता राज्यशकट चालविण्यासाठी सरकार जनतेकडून विविध प्रकारचे कर आकारत असते. या कर संकलनातून राज्य सरकारची तिजोरी भरते. हाच पैसा कल्याणकारी योजनांसाठी राबवला जातो. मात्र, खर्च भागविण्यासाठी राज्यांना कर्जेही घ्यावी लागतात. केवळ केंद्र सरकारच कर्जे घेते असे नाही तर देशभरातील ३१ राज्यांनी विविध स्वरूपात कर्जे घेतली असून त्यात महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

१,२२,००० कोटी राज्यावरील एकूण कर्ज४७०% चार वर्षांतील वाढ- गेल्या चार वर्षांत कर्ज घेण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण विक्रमी ४७० टक्क्यांनी वाढले आहे.-बाजार, बँका, वित्तीय संस्था आणि केंद्राकडून घेतलेली उचल या सगळ्याच्या ताळेबंदातून ही माहिती समोर आली.

उत्तर प्रदेश-गुजरातला चांगले रेटिंग- उत्तर प्रदेशसारख्या मागास राज्याचे कर्ज घेण्याचे प्रमाण अवघे ५० टक्के एवढेच आहे.- गुजरातने गेल्या चार वर्षांत सर्वात कमी कर्ज घेतले आहे. - कर्ज घेण्याच्या या प्रमाणामुळे दोन्ही राज्यांचे रेटिंग चांगले आहे. -सर्व ३१ राज्यांनी २०१८-१९ मध्ये एकूण पाच लाख ६२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. -हे प्रमाण चार वर्षात वाढून १० लाख ६० हजार कोटी रुपये झाले आहे.

अर्थ मंत्रालय म्हणते...राज्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जे घेतली असली तरी त्यांनी वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचे (एफआरबीएम) पालन केले असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले आहे.

राज्यांनी घेतलेले कर्ज (आकडेवारी कोटींमध्ये)राज्य    २०२१-२२    २०२०-२१    २०१९-२०    २०१८-१९महाराष्ट्र    १,२२,५१६     १,०९,५२९    ५७,१०६    २६,०२६उत्तर प्रदेश    ७५,५०९    ७९,८९८    ७३,७७९    ५१,५९५गुजरात    ५०,५००    ६०,७८७    ४३,४९२    ४३,१४७मध्य प्रदेश    ५७,३९९    ६४,४११    ३४,३६४    २९,१२२हरयाणा    ६३,२५८    ४३,१६५    ४३,१७०    ३३,७६०

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEconomyअर्थव्यवस्थाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार