महाराष्ट्र सदन वाद - बिपीन मलिक यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव
By Admin | Updated: July 25, 2014 13:38 IST2014-07-25T13:23:10+5:302014-07-25T13:38:25+5:30
महाराष्ट्र सदनातील गैरसोयी व अनागोंदी कारभाराविरोधात आवाज उठवत शिवसेनेने निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याविरोधात लोकसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे.

महाराष्ट्र सदन वाद - बिपीन मलिक यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५ - राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील गैरसोयी व अनागोंदी कारभाराविरोधात आवाज उठवत शिवसेनेने निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याविरोधात लोकसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. लोकसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारला असून आता याप्रकरणी सरकारला उत्तर द्यावे लागणार आहे.
दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासाठी जाणा-या खासदारांना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सदनात मुक्काम करावा लागत आहे. मात्र महाराष्ट्र सदनातील कॅंटिनमध्ये खाण्यापिण्याच्या पुरेशी सुविधा नाहीत. तसेच उत्तरप्रदेशमधील खासदाराची महाराष्ट्र सदनात बडदास्त ठेवली जात असताना महाराष्ट्राच्या खासदारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सेनेने केला आहे. याविरोधात शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनात आंदोलनही केले होते.
आता या हक्कभंग प्रस्तावावर सरकार यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.