विषारी दारूने घेतला १७०० लोकांचा बळी महाराष्ट्रात सर्वाधिक ३६० मृत्यू
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:44+5:302015-08-03T22:26:44+5:30
नितीन अग्रवाल/नवी दिल्ली

विषारी दारूने घेतला १७०० लोकांचा बळी महाराष्ट्रात सर्वाधिक ३६० मृत्यू
न तीन अग्रवाल/नवी दिल्लीअवैध दारू विक्रीचा गोरखधंदा देशात कायम वाढत आहे. गतवर्षी एकट्या महाराष्ट्रात विषारी दारूने ३५९ लोकांचा बळी घेतला. विशेष म्हणजे राज्यात या काळात बनावट मद्यसाठा पकडल्याची एकही घटना नाही. देशभरात गतवर्षी विषारी दारूच्या सेवनामुळे १६९९ लोक मृत्युमुखी पडले. गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीतून हे वास्तव उघड झाले आहे. गत तीन वर्षांत विषारी दारूमुळे देशभरात २,९२७ लोकांनी आपला जीव गमावला. गतवर्षी सर्वाधिक १६९९ लोकांनी आपला जीव गमावला. या वर्षात विषारी दारूने १७१ लोक गंभीर आजारी पडले. २०१३ मध्ये विषारी दारूने ४९७ लोकांचा तर २०१२ मध्ये ७३१ लोकांचा बळी गेला. गृहराज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जकात कर कायद्यांतर्गत बनावट मद्यसाठा जप्तीबाबतची आकडेवारी २०१४ पासून ठेवली जात आहे. त्यानुसार, गत वर्षभरात देशात बनावट मद्यसाठा जप्तीची १ लाख ८५ हजार ९७७ प्रकरणे समोर आली. यापैकी सर्वाधिक प्रकरण मध्य प्रदेशातील(५१,६४६)आहेत. यापाठोपाठ उत्तर प्रदेश (३७,३७०), ओडिशा ( १५,०६५), छत्तीसगड (१४,२६३), हरियाणा ( १३,५४०) आणि राजस्थान (१३,०७२) या राज्यांचा क्रमांक लागतो. यादरम्यान देशभरातून २.८५ कोटी लिटर नकली दारू जप्त करण्यात आली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल चौधरी यांनी लोकसभेत सांगितले की, बनावट दारूच्या विक्रीवर अंकुश ठेवणे, यामुळे होणारे मृत्यू टाळणे आणि दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे प्राथमिकदृष्ट्या राज्य सरकारची जबाबदारी आहे.बॉक्सगुजरातेतही बनावट दारूचा कहरगुजरातेत संपूर्ण दारूबंदी असताना २०१२ मध्ये बनावट दारूची १३९ प्रकरणे समोर आली. ही दारू सेवन केल्याने १४३ जणांनी जीव गमावला. २०१३ मध्ये २९ लोकांचे बळी गेले, तर २०१४ मध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.बॉक्सबनावट दारूचा काळाबाजार(सन २०१४)राज्ये/ केंद्रशासित बळी आजारीमद्यसाठा जप्तप्रदेश महाराष्ट्र ३५९ १६ ०मध्य प्रदेश १८८ १६ ३५६८०७३ छत्तीसगड १५६ ० ८४१९८ पंजाब ११८ ० २१८६६८५ हरियाणा ११७ ० ८७५४६० कर्नाटक १११ ४ ७७६६६५२ तेलंगण १०१ ६ ९७३३६८ पुड्डुचेरी ९५ ० १५५झारखंड ८८ १५ ४१८८८उत्तर प्रदेश ८५ २४ ३५४३४५३