Bhagat Singh Koshyari: “उद्धव ठाकरे CMपदासाठी योग्य नव्हते, शरद पवारांसारखा मार्गदर्शकही वाचवू शकला नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 07:39 PM2023-02-20T19:39:07+5:302023-02-20T19:40:06+5:30

Bhagat Singh Koshyari: उद्धव ठाकरे हे संत माणूस, ते कुठे राजकारणात आले, त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी, असा सल्ला देण्यात आला आहे.

maharashtra former governor bhagat singh koshyari advice to uddhav thackeray after resignation | Bhagat Singh Koshyari: “उद्धव ठाकरे CMपदासाठी योग्य नव्हते, शरद पवारांसारखा मार्गदर्शकही वाचवू शकला नाही”

Bhagat Singh Koshyari: “उद्धव ठाकरे CMपदासाठी योग्य नव्हते, शरद पवारांसारखा मार्गदर्शकही वाचवू शकला नाही”

googlenewsNext

Bhagat Singh Koshyari: अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांचा काही दिवसांपूर्वी राजीनामा केंद्राने मंजूर केला. यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आताच्या घडीला महाराष्ट्रात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले आहे. यातच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा बनवले, या शब्दांत भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे. त्यांनी यापासून लांब राहावे, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, त्यांनी संघटना चालवायला पाहिजे होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आले. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही, अशी टीका भगतसिंह कोश्यारी यांनी केली. 

नियतीने उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचले

महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवले होते. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून खाली उतरवले. मी त्यांना सत्तेतून खाली उतरवले नाही, असे सांगत, त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती, असा सल्ला भगतसिंह कोश्यारींनी यावेळी दिला. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना मसुरी या ठिकाणी येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचे होते. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरावे लागले होते. या घटनेचा धागा पकडून भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: maharashtra former governor bhagat singh koshyari advice to uddhav thackeray after resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.