शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

SCचे कडक ताशेरे, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कोर्टाचा अनादर करणार नाही पण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 21:10 IST

Rahul Narvekar Reaction On Supreme Court Comments: आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने तीव्र शब्दांत फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांनी सावध प्रतिक्रिया दिली.

Rahul Narvekar Reaction On Supreme Court Comments: आमदार अपात्रतेच्या सुनावणीसंदर्भात होत असलेल्या दिरंगाईबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभा अध्यक्षांकडून सादर करण्यात आलेले वेळापत्रक फेटाळून लावत मंगळवारी नवे वेळापत्रक सादर करावे अन्यथा आदेश पारित करू, या शब्दांत न्यायालयाने खडसावले. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, कोणतीही तडजोड न करता मला हा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय मी घेईनच. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशांचा अनादर कुठेही केला जाणार नाही. पण विधिमंडळाची आणि विधानभवनाचे सार्वभौमत्व राखणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवून मला निर्णय घ्यायचा आहे. विधिमंडळाचे नियम आणि संविधानाच्या तरतुदी यांच्याशी कुठेही तडजोड न करता मला निर्णय घ्यावा लागेल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. 

निवडणुकींना समोर ठेवून निर्णय देणार नाही

निवडणुकींना समोर ठेवून निर्णय देणार नाही. लवकरात लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करणार आहे. संविधानिक तरतुदींचे पालन न करता निर्णय घेतला, तर ते चुकीचे ठरेल. नैसर्गिक न्याय, तत्व, विधिमंडळातील नियम आणि तरतुदींबरोबर कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही. याचे भान राखत निर्णय घ्यावा लागेल. मी हा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवेन, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावे की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे, पोरखेळ करताय का? न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करु नका. आम्हाला नवीन वेळापत्रक द्या. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत. विधानसभा अध्यक्षांना समजत नसेल तर तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांनी अध्यक्षांबरोबर बसावे व त्यांना समजावून सांगा की सर्वोच्च न्यायालय काय आहे. आमचे आदेश पाळले गेले पाहिजे. वेळापत्रक बरोबर दिले नाही तर तुमच्यावर २ महिन्यांचा कालावधी लादावा लागेल. लवकर निर्णय घ्या, तुम्ही निवडणुकीसाठी थांबले आहात का, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Narvekarराहुल नार्वेकर