निर्मोही आखाडयात महाप्रसाद व साधूमहंतांचा सत्कार

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30

पंचवटी : तपोवनातील साधूग्राममधील निर्मोही आखाडयात स्व. श्रीमहंत भरतदासजी महाराज मुलकीवार दिग्वीजय नरेश रोकडीया हनुमान मुसलातलाई उयपुरी यांच्या स्मरणार्थ भाविकांना महाप्रसाद वाटप व साधूमहंतांचा सत्कार करण्यात आला.

Mahaprasad and Sadhumahants are honored in the Nirmohi Akhardya | निर्मोही आखाडयात महाप्रसाद व साधूमहंतांचा सत्कार

निर्मोही आखाडयात महाप्रसाद व साधूमहंतांचा सत्कार

चवटी : तपोवनातील साधूग्राममधील निर्मोही आखाडयात स्व. श्रीमहंत भरतदासजी महाराज मुलकीवार दिग्वीजय नरेश रोकडीया हनुमान मुसलातलाई उयपुरी यांच्या स्मरणार्थ भाविकांना महाप्रसाद वाटप व साधूमहंतांचा सत्कार करण्यात आला.
निर्मोही आखाडयाचे श्री महंत परमात्मादास महाराज यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी श्री पंचरामानंदीय निर्मोही आखाडयात तीन अनि आखाडयांचे विधीवत निशाण पुजन, महाआरती, इष्टदेवतेचे पूजन व सर्व संत महंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन परमात्मादास यांच्यावतीने साधूमहंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महंत घन:श्यामदास महाराज, श्री विष्णूदासजी महाराज, सेवादास महाराज, देविदास, किशोरदास, इश्वरदास, गोपालदास, सितारामदास, शितलदास, आदिंसह गुरूभाई, दादागुरू तसेच साधूसंत मोठया संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
टीप- फोटो एनएसके इडीटवर मेल केला आहे. महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी निर्मोही आखाडा

Web Title: Mahaprasad and Sadhumahants are honored in the Nirmohi Akhardya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.