महानदीचा कोप
By Admin | Updated: August 8, 2014 02:23 IST2014-08-08T02:23:49+5:302014-08-08T02:23:49+5:30
ओडिशात आलेल्या पुरामुळे महानदी डेल्टाचा मोठा भूभाग पुराच्या विळख्याने घेरला असून राज्यातील पाऊस व पुराच्या तडाख्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 34 झाली आहे.

महानदीचा कोप
>भुवनेश्वर : ओडिशात आलेल्या पुरामुळे महानदी डेल्टाचा मोठा भूभाग पुराच्या विळख्याने घेरला असून राज्यातील पाऊस व पुराच्या तडाख्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 34 झाली आहे.
विशेष मदत आयुक्त पी.के. महापात्र यांनी, राज्यातील 23 जिलंमधील 1553 गावांत राहणारे 9.95 लाख नागरिक पूरग्रस्त झाल्याचे सांगितले आहे.
महानदीचा जलस्तर अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर गेला असल्याची तसेच हिराकुंड तलावातील जलप्रवाह घटला असल्याची माहिती देऊन त्यांनी राज्यात पुरात बुडून वा भिंत कोसळून ठार झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे म्हटले.
फार मोठय़ा पुराचा धोका टळला असल्याचे सांगताना त्यांनी मुंडुली गावात महानदीचा प्रवाह 11 लाख क्युसेक असून तो 12 लाख क्यूसेकहून अधिक असण्याची शक्यता होती असे पुढे म्हटले आहे. काही भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रंनी सांगितले. (वृत्तसंस्था)
4नवी दिल्ली : ओडिशा राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याला सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन आज दिले आहे. लोकसभेत बीजू जनता दलाचे भृतुहारी मेहताब यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, याबाबत आपण तात्काळ मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी बोलणो केल्याचे म्हटले. यावेळी आपण पूरग्रस्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व त:हेची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सिंग यांनी सांगितले.
4याखेरीज राज्याला अन्य काही मदत लागल्यास ती राज्याने सांगितली तर केंद्र त्यावर विचार करेल अशीही जोड सिंग यांनी दिली. राज्य आपत्ती कोषातील 75 टक्के वाटा हा केंद्राचा असतो. या कोषातून पटनायक त्यांना हवी तेवढी रक्कम घेऊ शकतात असे प्रतिपादन सिंग यांनी पुढे केले.