शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभमेळा: अमित शाह यांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान, मुख्यमंत्री योगीही होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:03 IST

Amit Shah Holy Dip at Mahakumbh Prayagraj Video : गृहमंत्री अमित शाहा यांनी सोमवारी प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये जाऊन श्रद्धापूर्वक पवित्र स्नान केले

Amit Shah Holy Dip at Mahakumbh Prayagraj Video : देशात सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुभमेळ्याची खूपच चर्चा आहे. रोज येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. त्यातच सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांनी प्रयागराजमध्ये पोहोचून महाकुंभ २०२५ मध्ये सहभाग घेतला आणि अतिशय श्रद्धापूर्वक शाही स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह गृहमंत्र्यांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला.

अमित शाह यांनी केलं शाही स्नान, पाहा VIDEO

अमित शाह यांनी सकाळीच सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करत म्हटले होते की, कुंभ हे समरसतेवर आधारित जीवनाचे आपले शाश्वत तत्वज्ञान आहे. आज मी प्रयागराज या धार्मिक नगरीमध्ये एकता आणि अखंडतेच्या या महान उत्सवात संगमात स्नान करण्यासाठी आणि संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. त्यासाठी मी उत्सुक आहे. प्रयागराज येथे पोहोचल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने त्यांचे पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत केले.

दरम्यान, महाकुंभ मीडिया सेंटरने गृहमंत्री अमित शाह २७ जानेवारीला महाकुंभला पोहोचणार असल्याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. या प्रसिद्धीपत्रकानुसार, अमित शाह प्रथम प्रयागराजला पोहोचतील आणि त्रिवेणी संगम येथे गंगेत स्नान करतील. यानंतर ते बडे हनुमानजी मंदिर आणि अक्षय वट येथे जातील. यासोबतच ते महाराज आणि इतर संतांसोबत भोजन करतील आणि जुना आखाड्याला भेट देतील. धर्मनगरीच्या भेटीदरम्यान ते गुरू शरणानंद जी यांच्या आश्रमात जाऊन गुरू शरणानंद जी आणि गोविंद गिरी जी महाराज यांची भेट घेतील. यानंतर ते शृंगेरी, पुरी आणि द्वारकाच्या शंकराचार्यांचीही भेट घेतील. त्यानंतर अमित शाह संध्याकाळी दिल्लीला रवाना होतील.

टॅग्स :Amit Shahअमित शाहKumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथBaba Ramdevरामदेव बाबा