शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महाकौशल : दोन्ही प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 07:20 IST

भाजपाला बंडखोरांकडून घरचा अहेर; कमलनाथ यांच्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह, मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा काँग्रेसमध्ये

गजानन चोपडे

जबलपूर : भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या महाकौशल क्षेत्रात यंदा पक्षाला बंडखोरांनीच घरचा अहेर दिला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे संजय सिंग यांनी काँग्रेसशी घरोबा करीत थेट सीएम हाऊसलाच धक्का दिला आहे. काँग्रेसभाजपाचे प्रदेशाध्यक्ष महाकौशल क्षेत्रातील असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे मेव्हणे संजय सिंग यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी कमलनाथ यांच्यावर विश्वास दाखवीत काँग्रेस प्रवेश केला. त्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांवर आगपाखडही केली. काँग्रेसने संजय सिंग यांना बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी मतदार संघातून उमेदवारी दिली आहे तर भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष धीरज पटेरिया जबलपूरमधून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. आप्तांना पक्षाने तिकीट नाकारल्याने भाजपचे काही माजी केंद्रीय मंत्रीदेखील नाराज आहेत. एकंदरीत महाकौशल क्षेत्रात भाजपला निवडणुकीचा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही.

मागील निवडणुकीत महाकौशलच्या ३८ जागांपैकी २५ जागांवर भाजपला यश मिळाले होते तर काँग्रेसला १३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याकडे सोपविल्याने ओहोटी लागलेल्या पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचा दावा काँग्रेस गोटातून केला जात आहे. अनेक ठिकाणी भाजप उमेदवारांना मतदार संघातच विरोधाचा सामना करावा लागत आहे. कमलनाथ छिंदवाडा तर राकेश सिंग जबलपूर येथील असल्याने महाकौशल क्षेत्रातील जागा दोघांसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार राकेश सिंग यांचा बहुतांश वेळ पक्षांतर्गत बंडखोरांची समजूत घालण्यातच जात आहे.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील संशोधनानंतर त्याविरुद्ध दंड थोपटून गांधी जयंतीदिनी सपॉक्स समाजवादी पक्षाच्या स्थापनेने भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढविली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १६ नोव्हेंबर रोजी महाकौशल क्षेत्राचा दौरा करणार आहेत. भाजपच्या रथाचे सारथ्य तूर्त मुख्यमंत्र्यांच्याच हाती आहे.तीन मंत्रीही अडचणीतओमप्रकाश धुर्वे (शहपुरा), संजय पाठक (विजयराघवगड) आणि शरद जैन (जबलपूर मध्य) या तीन मंत्र्यांनाही मतदारसंघातच विरोध असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. खा. फग्गनसिंग कुलस्ते आणि प्रल्हाद पटेल या माजी केंद्रीय मंत्र्यांकडूनही पक्षाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र फग्गनसिंग कुलस्ते यांचे नातेवाईक कमल मरस्कोल्हे यांना सिवनी जिल्ह्यातील बरघाट मतदार संघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने कुलस्ते नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मरस्कोल्हे यांचे नाव पहिल्या यादीत होते. परंतु ऐनवेळी बी फार्म दुसऱ्याला देण्यात आला. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018