महाडच्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकाच्या व्यवस्थापनाची मनमानी बार्टी हटावसाठी प्रांत कार्यालयावर काढणार मोर्चा; महासंचालक जातीयवादी असल्याचा आरोप
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:43+5:302015-03-14T23:45:43+5:30
महाड : चवदार तळे सत्याग्रहासह महाडमध्ये झालेल्या दलित चळवळीच्या इतिहासाच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात यासाठी राज्य शासनाने २० कोटी रु. खर्चून बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकाचा वापर करण्यास महाडकरांनाच मज्जाव होत आहे. ही बाब अन्यायकारक असून डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) पुणे या संस्थेकडून या स्मारकाचा ताबा शासनाने त्वरित काढून घ्यावा या मागणीसाठी १८ मार्च २०१५ रोजी महाडच्या प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दलितमित्र मधुकर गायकवाड यांनी शनिवारी दिला.

महाडच्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकाच्या व्यवस्थापनाची मनमानी बार्टी हटावसाठी प्रांत कार्यालयावर काढणार मोर्चा; महासंचालक जातीयवादी असल्याचा आरोप
म ाड : चवदार तळे सत्याग्रहासह महाडमध्ये झालेल्या दलित चळवळीच्या इतिहासाच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात यासाठी राज्य शासनाने २० कोटी रु. खर्चून बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकाचा वापर करण्यास महाडकरांनाच मज्जाव होत आहे. ही बाब अन्यायकारक असून डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) पुणे या संस्थेकडून या स्मारकाचा ताबा शासनाने त्वरित काढून घ्यावा या मागणीसाठी १८ मार्च २०१५ रोजी महाडच्या प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दलितमित्र मधुकर गायकवाड यांनी शनिवारी दिला.डॉ. आंबेडकर स्मृती स्मारकाचे व्यवस्थापन सांभाळणार्या बार्टी या संस्थेचे महासंचालक परिहार हे पक्के जातीयवादी असल्याचा आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला. डॉ. आंबेडकर स्मारकाच्या मनमानीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एका सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या बैठकीत गायकवाड यांनी स्मारकाच्या व्यवस्थापनाबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. हे स्मारक म्हणजे महाडचे एक सांस्कृतिक वैभव आहे. या स्मारकातील नाट्यगृह, तरणतलाव यांचा वापर करण्यास महाडकरांना व्यवस्थापनाकडून नकार दिला जात आहे. शासनाने कोट्यवधी रु. खर्चून उभारलेल्या या सुसज्ज वास्तूचा महाडकरांसाठीच वापर व्हायला हवा. मात्र बार्टीचे अधिकारी या स्मारकाचे व्यवस्थापन पुण्यातून सांभाळतात, त्यांची उद्दामपणाची वागणूक महाडकर यापुढे सहन करणार नाही. या स्मारकातील नाट्यगृह येत्या दोन दिवसांत महाडकरांसाठी खुले करून न दिल्यास बार्टीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला.बार्टीचे महासंचालक डॉ. आंबेडकर स्मारक म्हणजे आपल्या बापजाद्याचीच मालमत्ता असल्याचा आव आणतात. बार्टीचे अधिकारी महाडकरांना नाट्यगृह वापरण्यास मज्जाव करून महाडकरांनाच आव्हान देत असतील तर या आव्हानाला जशाच तसे उत्तर देण्याचा इशाराही मधुकर गायकवाड यांनी देत आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या देखभालीसाठी आलेल्या खर्चात एक कोटी रु. चा गैरव्यवहार झाल्याचा आरोप गायकवाड यांनी या बैठकीत केला.सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांकडे या स्मारकाच्या व्यवस्थापनाच्या विरोधात अनेकवेळा तक्रारी करूनही या विभागाचे मंत्री त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.सुहासिनी नाट्यधारा संस्थेचे उमेश भिंडे यांनीही यावेळी बार्टीच्या अधिकार्यांच्या मनमानीविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त केली. या अधिकार्यांच्या आडमुठेपणामुळे आपल्या संस्थेला तीन वेळा कार्यक्रमाच्या तारखा बदलाव्या लागल्या, असे सांगून शेवटी नाट्यगृह उपलब्ध न झाल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे भिंडे यांनी सांगितले. रंगसुगंधचे अध्यक्ष सुधीर शेठ, सचिन कदम यांनीही यावेळी आपले विचार मांडले.महाडकरांना आवाहनबार्टीचे महासंचालक पुण्यात बसून महाडकरांना आव्हानाची भाषा करीत असतील तर त्यांचे आव्हान महाडकर स्वीकारण्यास तयार आहेत, याचा जाब विचारण्यासाठी, तसेच स्मारकाचा ताबा बार्टीकडून काढून द्यावा या मागणीसाठी १८ मार्चला आयोजित केलेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच महाडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दलितमित्र मधुकर गायकवाड यांनी केले आहे.फोटो - 14महाड डॉ. आंबेडकर