शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

Mahakumbh Traffic Jam: जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी; महाकुंभकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १५ तास ट्रॅफिक जाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:20 IST

Maha Kumbh 2025 Traffic Jam: प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. प्रयागराज संगम रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी असल्याने ते बंद करण्यात आले आहे.

Mahakumbh 2025 Traffic Jam:उत्तर प्रदेशमधीलप्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक संगमात पवित्र स्नान करत आहेत. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे दोन दिवस मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या आहे. संगमला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर १० ते १५ किलोमीटर रस्ते जाम झाले आहे.

वाराणसी, लखनऊ, कानपूर ते प्रयागराज जाणाऱ्या रस्त्यांवर २५ किलोमीटरपर्यंत जाम आहे. दुसरीकडे, प्रयागराज संगम रेल्वे स्थानकाबाहेर जास्त गर्दी असल्याने स्टेशन बंद करण्यात आले आहे. आज प्रयागराजकडे जाणे अशक्य आहे, कारण २००-३०० किलोमीटर वाहतूक कोंडी आहे," असे पीटीआयच्या वृत्तात पोलिसांनी सांगितले आहे. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमध्ये मध्य प्रदेशातील कटनी, जबलपूर, मैहर आणि रेवा जिल्ह्यांमधील रस्त्यांवर हजारो कार आणि ट्रकच्या मोठ्या रांगा दिसत आहेत. 

मुंडेंचा राजीनामा कधी घेणार?; अंजली दमानियांसह अंबादास दानवे, सुरेश धस यांचा सवाल

प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५७ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आणि १३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत ४३.५७ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे.

१५ फेब्रुवारीनंतरच प्रयागराजला येण्याचे आवाहन

महाकुंभामध्ये प्रमाणापेक्षा जास्त भाविक आल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. रस्त्यांवर वाहने गेल्या काही तासांपासून रेंगाळत आहेत. संगमात डुबकी मारण्यासाठी जाणारे आणि तिथून परतणारे भाविक कोंडी सुटण्याची वाट पाहत आहेत, अनेकजण गेल्या काही तासापासून वाहनातच बसून आहेत. प्रयागराजला जाण्यासाठी सुमारे ७ मार्ग आहेत. या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी आहे. प्रशासन लोकांना १५ फेब्रुवारीनंतरच प्रयागराजला येण्याचे आवाहन केले आहे. शहराच्या आतही ७ ते ८ किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडी आहे.

प्रयागराजच्या बाहेर ५० हजारांहून अधिक वाहने उभी आहेत. पेट्रोल आणि गॅसचाही तुटवडा आहे. संगम रेल्वे स्थानकाबाहेर जास्त गर्दी असल्याने स्टेशन बंद करण्यात आले. रेल्वे स्थानक १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. पोलीस अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितले की, “वाहनांची संख्या खूप जास्त आहे आणि प्रवासी एकमेकांच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी होत आहे.  सिंह यांच्या मते, मौनी अमावस्येला जितकी गर्दी आली होती तितकीच गर्दी आता येत आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी, जत्रेच्या जवळील पार्किंग लॉट पहिल्यांदा भरले जात होते आणि नंतर दूरच्या पार्किंग लॉटमध्ये पाठवण्यात येत होते.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाTrafficवाहतूक कोंडीUttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराज