शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभात सहभागी होणार; संन्यासी आयुष्य जगणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:43 IST

Maha Kumbh 2025: Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल महाकुंभात सहभागी होणार आहेत.

Maha Kumbh 2025:उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये येत्या 13 जानेवारीपासून पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणारा हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभासाठी जगभरातून लाखो भाविक, साधू-संत येणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महाकुंभासाठी एक विशेष पाहुणी महाकुंभासाठी येणार आहे. ही विशेष पाहुणी स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल आहेत. त्या 'कल्पवास' या प्राचीन हिंदू परंपरेत सहभागी होणार आहेत.

13 जानेवारीला प्रयागराजमध्ये येणारजगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभ मेळा 2025 मध्ये सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन 13 जानेवारीला प्रयागराजमध्ये दाखल होतील. त्या निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात मुक्काम करणार आहेत.

29 जानेवारीपर्यंत कल्पवासात राहणारआपल्या या महाकुंभ दौऱ्यात लॉरेन पॉवेल 29 जानेवारीपर्यंत कल्पवास येथे राहतील. इथे त्या विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होणार असून, पवित्र प्रयागराज संगमात स्तान करणार आहेत. 

लॉरेन पॉवेल काय करतात?लॉरेन पॉवेल जॉब्स यांना पती स्टीव्ह जॉब्सकडून त्यांना संपत्तीचा वारसा मिळाला आहे. अॅपल व्यतिरिक्त पॉवेल जॉब्स त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी इमर्सन कलेक्टिव्ह नावाची फर्म स्थापन केली आहे, जी शिक्षण, आर्थिक गतिशीलता, इमिग्रेशन आणि पर्यावरण समस्यांवर काम करते. त्यांनी 2021 मध्ये Waverley Street Foundation देखील तयार केली, जी पर्यावरण क्षेत्रात कार्य करते.

कल्पवास काय आहे?महाकुंभाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कल्पवास. ही परंपरा खूप जुनी असून, त्याचा उल्लेख महाभारत आणि रामचरितमानस सारख्या ग्रंथात आढळतो. जे लोक कल्पवास करतात, त्यांना कल्पवासी म्हणतात. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा कल्पवासाचा काळ असतो. जे कल्पवास करतात, ते आपले आरामदायी जीवन सोडून संगमाजवळ साध्या तंबूत राहतात आणि दररोज गंगा नदीत स्नान करुन भजन अन् संतांची प्रवचने ऐकतात. साध्या भाषेत सांगायचे तर, काही दिवस संन्यासी आयुष्य जगणे म्हणजे कल्पवास.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाSteve Jobsस्टीव्ह जॉब्सUttar Pradeshउत्तर प्रदेश