शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

"मला आई व्हायचंय, स्पर्म प्रिझर्व्ह करा…", पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची मागणी, डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:38 IST

डॉक्टरांच्या समजुतीनंतर पत्नी कशीतरी तयार झाली, त्यानंतर पतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

मध्य प्रदेशातील रीवामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने डॉक्टरांकडे विचित्र मागणी केली. यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त करत महिलेने आपल्या मृत पतीच्या शुक्राणूंची (स्पर्म) मागणी केली.  यासाठी महिलेने डॉक्टरांना मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यापासून रोखले. दरम्यान, पतीचा मृत्यू होऊन २४ तास उलटून गेल्यामुळे शुक्राणू जतन करता येत नाहीत. तसेच, वैद्यकीय महाविद्यालयात शुक्राणू जतन करण्याची सुविधा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या समजुतीनंतर पत्नी कशीतरी तयार झाली, त्यानंतर पतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

रीवा शहरातील बिचिया पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस लाईनजवळील चौकात झालेल्या दुचाकी अपघातात सिधी जिल्ह्यातील चुरहट येथील जितेंद्र सिंह गहरवार यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र सिंह गहरवार यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी संजय गांधी रुग्णालयात आणला. अपघाताच्या वेळी त्यांची पत्नी शहराबाहेर होती. त्यामुळे तिला फोनद्वारे जितेंद्र सिंह गहरवार यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर पत्नीने फोनवर आपल्या पतीचे पोस्टमार्टम करू नका, असे सांगितले.

दरम्यान, जितेंद्र सिंह गहरवार यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. जितेंद्र सिंह गहरवार यांच्या पत्नीला मुलाची आई व्हायचे होते. याच कारणामुळे पत्नीने जितेंद्र सिंह गहरवार यांचे पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला. यानंतर ती संजय गांधी मेडिकल कॉलेजमध्येही पोहोचली आणि तिथल्या डॉक्टरांना पतीचे स्पर्म जपून ठेवण्यास सांगितले. तर वैद्यकीय डॉक्टरांनी साफ नकार दिला. यामागे दोन कारणे होती, पहिले कारण म्हणजे २४ तासांनंतर शुक्राणू जतन करता येत नाहीत आणि दुसरे म्हणजे, वैद्यकीय महाविद्यालयात शुक्राणू जतन करण्याची सुविधा नाही.

मृत व्यक्तीच्या शरीरातील शुक्राणू २४ तासांच्या आत जतन करणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त वेळ निघून गेल्यावर शुक्राणू जतन केले जाऊ शकत नाहीत. याशिवाय, ही प्रक्रिया अवलंबण्याची कोणतीही सुविधा वैद्यकीय महाविद्यालयात नाही, असे मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाचे एचओडी डॉ. रजनीश कुमार पांडे यांनी सांगितले. दरम्यान, डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर मृताच्या पत्नीने एकच गोंधळ घातला. यानंतर डॉक्टर आणि पोलिसांनी खूप समजावून सांगितल्यानंतर पत्नीने पोस्टमॉर्टम करण्यासाठी होकार दिला. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरAccidentअपघातJara hatkeजरा हटके