शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

भाजपाच्या मंत्र्यांचा राजेशाही थाट; पायपीट टाळण्यासाठी कार थेट प्लॅटफॉर्मवर नेण्याचा घातला घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 9:32 AM

रेल्वे प्रशासनासह पोलीस दल नियम मोडणाऱ्या मंत्र्यांच्या सेवेत

भोपाळ: मध्य प्रदेशात व्हीव्हीआयपी कल्चरचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधिया यांना रेल्वे गाडीतून उतरल्यावर फार चालावं लागू नये, यासाठी त्यांची कार थेट ग्वालियारच्या प्लॅटफॉर्मवर नेण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या गेटमधून गाडी प्लॅटफॉर्मवर नेण्यात आली, त्याच ठिकाणी 'गेटच्या आता वाहन नेल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल,' असा फलक दिसत आहे. मात्र तरीही सर्व नियम धाब्यावर बसवत मंत्री महोदयांना चालण्याचे कष्ट करावे लागू नयेत, याची काळजी रेल्वे प्रशासनानं घेतली. 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. यशोधरा राजे सिंधिया यांच्या 'राजेशाही'मुळे सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सिंधिया यांची कार थेट प्लॅटफॉर्मवर आल्यानं तेथील प्रवाशांना गाडीत चढताना अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेले पोलीस यावेळी सिंधिया यांच्या गाडीला सुरक्षा पुरवत होते. मध्य प्रदेशात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी मंत्र्यांचा हा राजेशाही थाट समोर भाजपासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. भाजपा मंत्र्यांच्या या राजेशाही वृत्तीवर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. तर आपल्याला नियमांची कल्पनाच नव्हती, अशी सारवासारव सिंधिया यांनी केली आहे. विशेष म्हणजे नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. नियम धाब्यावर बसवून कार थेट प्लॅटफॉर्मवर आणणाऱ्या मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. त्यामुळे नियम आणि कायदे फक्त सामान्य माणसासाठीच असतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :ministerमंत्रीMadhya Pradeshमध्य प्रदेश