शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका निवडणुकीत अवघ्या 14 मतांनी पराभव; धक्क्याने काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 16:55 IST

मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी नगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने सतना, बुरहानपूर आणि खांडवा येथे निवडणुका जिंकल्या आहेत.

रेवा: आज मध्य प्रदेशात अनेक नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागत आहेत. यादरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. रेवा येथील हनुमाना नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा धक्का बसल्याने काँग्रेस उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

हरिनारायण गुप्ता हे काँग्रेसच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 09 मधून रिंगणात होते. अपक्ष उमेदवार अखिलेश गुप्ता यांनी अवघ्या 14 मतांनी हरिनारायण यांचा पराभव केला. हरिनारायण हे काँग्रेस पक्षाचे हनुमान मंडळाचे अध्यक्ष होते. मतमोजणी संपताच त्यांचा 14 मतांनी पराभव झाल्याचे वृत्त आले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

अनेक ठिकाणी भाजपचा विजयमध्य प्रदेशातील शहरी विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने सतना, बुरहानपूर आणि खांडवा येथे निवडणुका जिंकल्या आहेत. जबलपूर, छिंदवाडा आणि ग्वाल्हेरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. सिंगरौलीमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. इंदूर, भोपाळ आणि सागरमध्ये भाजप आघाडीवर आहे.

बुरहानपूरचे नगराध्यक्षपद भाजपच्या गोटातमध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरातून महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार माधुरी पटेल 542 मतांनी विजयी झाल्या आहेत. पटेल यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेस उमेदवार शहनाज अन्सारी यांचा 542 मतांनी पराभव केला. पटेल यांना 52,823 तर अन्सारी यांना 52,281 मते मिळाली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकcongressकाँग्रेसDeathमृत्यू