शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 13:00 IST

Lok Sabha Election Results Live: भाजपाची जोरदार आघाडी

भोपाळ: यंदाच्या निवडणुकीत मध्य प्रदेशात बंपर मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात तब्बल 9.59 टक्क्यांची वाढ झाली. मतदानाची ही वाढलेली टक्केवारी हाताला साथ देणार की हाताला चार हात लांब ठेऊन कमळ फुलवणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने राज्यातील 29 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. यंदाही राज्यातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असे अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मध्य प्रदेशात भाजपानं 28 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे यंदाही भाजपाला मध्य प्रदेशात घवघवीत यश मिळताना दिसत आहे. गेल्या वर्षी भाजपाने मध्य प्रदेशातील सत्ता गमावली. तब्बल दीड दशक सत्तेत असलेल्या भाजपाला थोड्या फरकाने राज्य गमवावं लागलं. विशेष म्हणजे भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा अधिक होती. याशिवाय राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या कामगिरीचा परिणाम थेट विधानसभेत दिसू शकतो. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसBJPभाजपा