इंदूर :मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बुधवारी(दि. 18) पहाटे भीषण आग लागल्याने 8 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिक कार चार्जिंगदरम्यान झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे. घरात मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर असल्याने आग अधिकच भडकली.
पहाटे घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तिळकनगर परिसरातील बृजेश्वरी एनएक्स कॉलनीत पहाटे 4 वाजता घडली. घराबाहेर Tata Punch EV चार्जिंगसाठी लावण्यात आली होती. यादरम्यान शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागली आणि काही वेळातच आग संपूर्ण घरात पसरली. घरात काही गॅस सिलेंडर ठेवले होते. त्यात स्फोट झाल्याने आग आणखी भीषण झाली.
बचाव कार्यासाठी 3 तासांची धडपड
घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 3 तास चाललेल्या बचावकार्यात 10 हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. अनेक जण आगीत अडकले होते. काही सदस्यांनी ग्रिल तोडून जीव वाचवला, मात्र काही जणांना बाहेर पडता आले नाही.
बिहारहून आलेले नातेवाईकही बळी
प्राथमिक माहितीनुसार, हे घर मनोज पुगलिया यांचे होते. ते मूळ बिहारमधील पूर्णिया येथील रहिवासी होते. त्यांचे नातेवाईकही कँसरच्या उपचारासाठी इंदूरमध्ये आले होते आणि त्यांच्याच घरी थांबले होते. या भीषण दुर्घटनेत पुगलिया यांच्या कुटुंबातील आणि पाहुण्यांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी आहेत.
मृत आणि जखमींची माहिती
या आगीत विजय सेठिया, छोटू, सुमन, राशि, मनोज, तनु आणि सिमरन यांचा मृत्यू झाला, तर सौरभ आणि हर्षित यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
Web Summary : Indore fire: EV car explosion kills eight, including cancer treatment visitors. Short circuit ignited gas cylinders. Rescue efforts saved ten; investigation underway.
Web Summary : इंदौर में इलेक्ट्रिक कार में आग लगने से कैंसर रोगियों सहित आठ की दर्दनाक मौत। शॉर्ट सर्किट से गैस सिलेंडर फटे। बचाव दल ने दस लोगों को बचाया, जांच जारी।