शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

...तेव्हा तेव्हा राज्य सरकार संकटात सापडेल; काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 08:09 IST

मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सरकारसमोरील अडचणी कायम

ठळक मुद्देज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थक आमदाराचा सूचक इशाराकमलनाथ सरकारसमोरील अडचमी कायमदिल्लीला गेलेले १० पैकी ६ आमदार परतले; ४ जण अद्याप नॉट रिचेबल

भोपाळ: मध्य प्रदेशमधल्या काँग्रेस सरकारचा धोका अद्याप टळलेला नाही. मंगळवारी रात्री अचानक दिल्लीला गेलेल्या काँग्रेस आघाडीतल्या १० आमदारांपैकी बरेचसे आमदार माघारी परतले असले तरी कमलनाथ सरकारसमोरील अडचणी संपलेल्या नाहीत. कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळातल्या एका सहकाऱ्यानंच सरकार संकटात सापडू शकतं, असं म्हणत सरकारच्या भवितव्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशात आणखी राजकीय घडामोडी घडू शकतात. कामगार मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया यांनी कमलनाथ सरकारच्या भवितव्याबद्दल अतिशय सूचक भाष्य केलं आहे. 'सरकारकडून जेव्हा जेव्हा आमचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची उपेक्षा केली जाईल, त्यांचा अपमान करण्यात येईल, तेव्हा तेव्हा सरकार संकटात सापडेल आणि त्यावेळी जे काय होईल, ते मी आत्ताच सांगू शकत नाही,' असं सिसोदिया एएनआयशी संवाद साधताना म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी रात्री काँग्रेस आघाडीतले दहा आमदार दिल्लीला रवाना झाले. हे आमदार दुसऱ्या दिवशी भाजपाच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार होते. मात्र एका आमदाराच्या गनमॅननं केलेल्या फोनमुळे ही बातमी फुटली. यानंतर काँग्रेसनं वेगवान हालचाली सुरू केल्या. काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी दिल्लीला रवाना झाले. ते काँग्रेस आघाडीतल्या आमदारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलात पोहोचले. यानंतर आघाडीतल्या दहापैकी सहा आमदारांनी भोपाळला परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कमलनाथ यांना दिलासा मिळाला. दिल्लीहून भोपाळमध्ये परतलेल्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतली. मात्र उर्वरित चार आमदार बंगळुरूत असल्याची चर्चा आहे. अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा यांनी आपण बंगळुरूत असल्याचं स्वत:चं सांगितलं आहे. याशिवाय काँग्रेस आमदार बिसाहूलाल सिंह, हरदीप सिंग डंग, रघुराज कंसानादेखील माघारी परतलेले नाहीत. गुरुवारी दुपारपर्यंत हे आमदार चार्टर्ड विमानानं भोपाळला पोहोचतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्याप तरी या आमदारांनी भोपाळ गाठलेलं नाही. यापैकी हरदीप सिंह डंग यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा