शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 16:24 IST

योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींच्या मंदिर भेटींवर टीका

भोपाळ: राहुल गांधी मंदिरात गुडघ्यावर बसले होते. त्यावेळी हे मंदिर आहे, मशीद नाही, याची आठवण त्यांना पुजाऱ्यांना करुन द्यावी लागली, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेले योगी आदित्यनाथ धारमध्ये जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राहुल यांच्या मंदिर भेटींवरुन त्यांना लक्ष्य केलं. राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळीही भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतलं होतं. हाच मुद्दा योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा उपस्थित केला. निवडणुका जवळ आल्या की राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळीदेखील त्यांनी हेच केलं होतं. त्यावेळी मंदिरात गेलेले राहुल गांधी गुडघ्यावर बसले होते. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी हे मंदिर आहे, मशीद नाही, याची आठवण त्यांना करुन दिली, अशा शब्दांमध्ये योगी आदित्यनाथांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 11 डिसेंबरला मतमोजणी होईल. सध्या मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आहे. मध्य प्रदेशात विधानसभेचे 230 मतदारसंघ आहेत. यातील 165 मतदारसंघ भाजपा, 58 मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. सलग 15 वर्ष सत्तेत असलेल्या भाजपासमोर यंदा काँग्रेसनं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक उत्कंठावर्धक ठरणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018