शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश विधानसभा - निवडणूक ड्युटीवरील तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 11:29 IST

राज्यातील 230 जागांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रकिया पार पडणार आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील 230 जागांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. मात्र, कुठे ईव्हीएमचा बिघाड तर कुठे निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्युमुळे या निवडणुकीला गालबोट लागले आहे. गुना येथील निवडणूक कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर इंदौर येथेही दोन निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील 230 जागांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रकिया पार पडणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या बिघाडामुळे मतदान प्रकिया काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. तर इंदौरमध्ये दोन निवडणूक अधिकाऱ्यांचा ह्रदय विकारने मृत्यू झाला आहे. या घटनेने मतदान केंद्रावर खळबळ उडाली असून पोलीस बंदोबस्तात पुन्हा मतदान सुरू झाले आहे. येथील दीपिका बाल मंदिरच्या नेहरू नगरमधील निवडणूक अधिकारी कैलाश पटेल (शिक्षक - उत्कृष्ट विद्यालय मुहू) यांना सकाळी 6.50 वाजता ह्रदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी यांनी पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गुना येथेही एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कामावरील ताण-तणावामुळेच पटेल यांना ह्रदयविकाराच झटका आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018ElectionनिवडणूकDeathमृत्यूPoliceपोलिस