शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराची हद्द! 400 कोटींमध्ये उभारलेला पूल 4 वर्षातच कोसळला, स्थानिकांची प्रचंड नाराजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:41 IST

ही सरकारी बांधकामाच्या दर्जावर आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे.

Madhya Pradesh: भ्रष्टाचाराने आपल्या देशाला किती पोखरले आहे, याचे ताजे उदाहरण मध्य प्रदेशातून समोर आले आहे. येथील जबलपूर-भोपाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 (NH-45) वरील वना रेल्वे ओव्हरब्रिजचा एक भाग कोसळण्याची घटना समोर आली आहे. हा फक्त अपघात नसून, सरकारी बांधकामाच्या दर्जावर आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

400 कोटी खर्चून बांधलेला पूल

भोपालकडून जबलपुरकडे येणारा ओव्हरब्रिजचा एक भाग गेल्या काही महिन्यांपासून खराब अवस्थेत होता. खबरदारी म्हणून त्या मार्गावरील वाहतूक बंद करून, केवळ जबलपुरहून भोपालकडे जाणाऱ्या एका लेनमधून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मात्र आता पूलाचा दुसरा भागही क्षतिग्रस्त झाल्याने प्रशासनाला तातडीने संपूर्ण वाहतूक वळवावी लागली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार वर्षांपूर्वी सुमारे 400 कोटी रुपये खर्चून हा पूल उभारण्यात आला होता. आता पूल कोसळल्याने प्रशासन, कंत्राटदार आणि यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठत आहे.

प्रशासन घटनास्थळी; पोलीस बंदोबस्त वाढवला

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वाहतूक पोलीस आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त चौरस्त्यांवर तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

400 कोटींचा प्रकल्प, पण चार वर्षांतच अपयश

हा रेल्वे ओव्हरब्रिज आणि 56 किलोमीटर लांबीचा जबलपुर-भोपाल मार्ग सुमारे 400 कोटी रुपये खर्चून चार वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या गुंतवणुकीनंतरही पूल इतक्या लवकर धोकादायक ठरणे, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

कोण होता कंत्राटदार?

रेल्वे ओव्हरब्रिजचे बांधकाम मेसर्स बागड इन्फ्रा कंपनी यांनी केले होते. सध्या या पुलावर दोष दायित्व कालावधी (Defect Liability Period) अंतर्गत देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होते आणि त्याचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडूनच केला जात होता. विशेष म्हणजे, या कंपनीविरोधात आधीच ब्लॅकलिस्टिंगची कारवाई करण्यात आली आहे.

MPRDC विरुद्ध NHAI, अधिकार क्षेत्रावर मतभेद

या घटनेनंतर जबाबदारीवरून दोन यंत्रणांमध्ये मतभेद समोर आले आहेत. मध्य प्रदेश रस्ते विकास महामंडळ (MPRDC) चे विभागीय व्यवस्थापक राकेश मोरे यांनी सांगितले की, हा NH-45 चा एप्रोच रोड असून प्री-कास्ट पॅनलचे मेंटेनन्स सुरू होते. काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने दुरुस्ती केली जात होती. दुसरीकडे, NHAI ने अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केले की, NH-45 वरील हा भाग NHAI च्या अधिकार क्षेत्रात नसून MPRDC अंतर्गत येतो. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदाराची दोष दायित्व कालावधी अद्याप संपलेली नसल्याने प्रकल्पाचा हँडओव्हर झालेला नाही.

ब्लॅकलिस्टेड कंपनीवर आधीच मोठे दंड

मेसर्स बागड इन्फ्रा कंपनीवर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. 2021 मध्ये पर्यावरण परवानगीशिवाय अवैध उत्खनन प्रकरणी 3 कोटी रुपयांचा दंड, 2022 मध्ये नर्मदा काठ परिसरात अवैध खनन प्रकरणी 82 कोटी रुपयांचा दंड...या प्रकरणात राजस्थानच्या बांसवाडा येथील कंपनी संचालक विनोद जैन यांना नोटीस बजावण्यात आली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Corruption Exposed: 400 Crore Bridge Collapses in 4 Years!

Web Summary : A ₹400 crore bridge in Madhya Pradesh collapsed within four years of construction, raising serious questions about corruption and construction quality. Authorities are investigating, highlighting disputes over responsibility and a blacklisted contractor's involvement in the project.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCorruptionभ्रष्टाचार