शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कमलनाथ सरकार पुन्हा धोक्यात; मध्य प्रदेशात भाजपाचा नवा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 22:38 IST

काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपाच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी यांनी केला होता.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातीलकाँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. परंतु मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हे दावे फेटाळून लावले असून सरकारला काहीही धोका नसल्याचे सांगितले होते. मात्र आता मंदसौरमधील सुवसरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हरदीप सिंग डंग यांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकारच्या अडचणी वाढल्या आहे.

हरदीप सिंग डंग यांच्यासह आणखी चार आमदारांना बंगळूरुमध्ये घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी मध्य प्रदेशमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. 

हरदीप सिंग डंग यांच्या राजीनाम्याबाबत कमलनाथ यांनी विचारले असता मला अद्याप त्यांच्याकडून कोणतेही पत्र आलेलं नाही असं सांगितले. तसेच हरदीप सिंग डंग यांच्यासोबत या विषयावर व्यक्तिशः चर्चा झाली नसल्यामुळे मी सध्या यावर काही बोलणार नाही असं कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपाच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मंत्री नरोत्तम मिश्रा, भूपेंद्र सिंह आणि रामपाल सिंह यांच्यासह काही नेत्यांनी काँग्रेसच्या आमदारांना जबदरस्ती घेऊन गेल्याचा आरोप जीतू पटवारी यांनी केला होता. शिवराज सिंह चौहान यांना सत्तेची हाव आहे. त्यामुळेच सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडून कटकारस्थानं आखली जात आहेत. मात्र यात ते यशस्वी होणार नाहीत. आम्ही हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहोत. मीदेखील त्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे. बहुजन समाज पार्टीच्या आमदार रमाबाई माझ्यासोबतच आहेत, अशी माहिती पटवारी यांनी दिली होती. 

१० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांचं सरकार कोसळेल, अशी योजना होती. दिल्लीत दोन, तर बंगळुरुत एका ठिकाणी या आमदारांना थांबवण्यात येणार होतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्याकडे आमदारांच्या बंगळुरू मुक्कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा सुगावा लागताच काँग्रेसनं त्यांच्या ११४ आमदारांना व्हिप बजावला होता. कोणत्याही आमदारानं पक्षाचा व्हिप अमान्य केल्यास त्याचं विधानसभेतलं सदस्यत्व रद्द होईल, असं संसदीय कार्यमंत्री गोविंद सिंह यांनी व्हिप जारी करताना म्हटलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास त्याची किंमत संबंधित आमदाराला चुकवावी लागेल, असा इशाराही सिंह यांनी दिला होता. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारत