शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मध्य प्रदेशात, 12 बसेसची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 14:09 IST

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशात उमटू लागले आहेत. मध्य प्रदेशात आंदोलकांनी जवळपास 12 बसेसची तोडफोड केल्याचे समजते.

ठळक मुद्देभीमा कोरेगाव घटनेचे पडसाद महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशात बंदला काही ठिकाणी दगडफेकीचे लागले गाटबोटबुरहानपुर येथील पुष्पक बस स्टॅण्डवर काही आंदोलकांनी 12 बसेसची केली तोडफोड

इंदूर : भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशात उमटू लागले आहेत. मध्य प्रदेशात आंदोलकांनी जवळपास 12 बसेसची तोडफोड केल्याचे समजते.पुण्यातील कोरेगाव भीमा येथील झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेच्या निषेधार्थ काल (दि.3) महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला होता. या पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. यानंतर भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काही संघटनांनी बंद पुकारला आहे. या बंदला काही ठिकाणी दगडफेकीचे गाटबोट लागले आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील पुष्पक बस स्टॅण्डवर काही आंदोलकांनी 12 बसेसची तोडफोड केली आहे. या तोडफोडीदरम्यान एक बसचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, दुसरीकडे आंदोलकांनी राजकोट - सोमनाथ महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले असून याठिकाणी सुद्धा काही बसेसची तोडफोड केल्याचे सांगण्यात येते. 

 

नक्षलवाद्यांनी रचला होता हिंसाचाराचा कट?पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाद निर्माण करुन व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित संघटनांच्या आंदोलनाचे लोण पसरावे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. भीमा कोरेगावातील हिंसाचार घडण्याच्या बरोबर एक दिवसापूर्वी मुंबईमध्ये नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशनची बैठक 'एल्गार परिषद'चे सीलबंद करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी हा निष्कर्ष काढला आहे. 

 

जिग्नेश मेवाणी आणि उमर खलिद यांच्याविरोधात मुंबईत सर्च वॉरंट गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्याविरोधात मुंबईतील जूहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केल्याचे वृत्त आहे. आज छात्र भारतीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. 

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMadhya Pradeshमध्य प्रदेश