शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

ह्रदयद्रावक! 4 वर्षीय भाचीचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मामाने मृतदेह खांद्यावर टाकून नेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 20:43 IST

मामा दोन तास रस्त्यावर भटकत राहिला; अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली

छतरपूर: मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयात एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, पण रुग्णालयाने रुग्णवाहिका न दिल्यामुळे मुलीच्या मामाने मृतदेह खांद्यावर उचलून नेला. बरेच अंतर चालल्यानंतर तो बस पकडून आपल्या गावी पोहोचला.

मामाने सांगितली आपबीतीछतरपूर जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर असलेल्या बजना येथील पाटण गावात राहणारे मुलीचे मामा किशोरी अहिरवार यांनी सांगितले की, "बुधवारी सकाळी 10 वाजता माझी भाची प्रीती तिच्या दोन मैत्रिणींसोबत नदीच्या काठावर खेळत होती. मी सुद्धा तिथेच आंघोळ करत होतो. तो परिसर चिखलमय झाला होता, ज्यामुळे प्रीती चिखलात गाडली गेली. तिच्यासोबत खेळणाऱ्या दोन मैत्रिणी रडू लागल्या. तिचा आवाज ऐकून मी पोहोचलो आणि प्रीतीला तात्काळ रुग्णालयात आणले."

2 तास भटकलो, पण रुग्णवाहिका मिळाली नाही"तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला छतरपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले. पण, वाटेतच तिचा मृत्यू झाला. मी मृतदेह घरी आणण्यासाठी अॅम्ब्युलन्स मागितली, पण मला अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. मी 2 तास हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे भटकलो. रात्र झाली होती, म्हणून मी भाचीला चादरीत गुंडाळून खांद्यावर ठेवले अन् पायी चालत निघालो. चौकातून रिक्षा घेऊन नाक्याला पोहोचलो आणि तिथून बसने गावी आलो."

अधिकारी जबाबदारीतून पळ काढत आहेतस्थानिक आमदाराने रुग्णालयाला एक रुग्णवाहिका दिली होती. पण ती रुग्णवाहिका गरजुंना मिळत नाही. जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. जीएल अहिरवार यांनी सांगितले की, आमदाराने दिलेली रुग्णवाहिका एका क्लबच्या स्वाधिन दिली आहे, तो क्लब रुग्णवाहिका चालवतो. त्यांनाच याचे कारण माहित असेल. तर, त्या क्लबचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे कोणताच व्यक्ती मदत मागायला आला नाही.

राज्यात खराब आरोग्य व्यवस्थाविशेष म्हणजे, मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

  • सिंगरौली जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने एका बापाने नवजात मुलाचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवून नेला. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले.
  • 10 सप्टेंबर रोजी पन्नाच्या रुग्णालयात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. यानंतर वडिलांनी मुलाचा मृतदेह गाडीवर टाकून गावी नेला. 
  • 3 सप्टेंबर रोजी सीहोर आणि शाजापुर जिल्यातील नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह गाडीवर टाकून न्यावा लागला.
  • 31 जुलै रोजी शहडोलच्या गोडारू गावात एका महिलेचा मृत्यू झाला, रुग्णवाहिका नसल्यामुळे मुलाने आईचा मृतदेह गाडीवर टाकून नेला.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू