शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 6:38 AM

१० मतदारसंघांमध्ये जय-पराजयात एक हजारापेक्षा कमी मतांचा फरक

- अमोल मचाले पुणे : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने ११४, तर भाजपाने १०९ जागा जिंकल्या. यापैकी १० मतदारसंघांमध्ये विजयी आणि पराभूत उमेदवारांत एक हजारापेक्षा कमी मतांचे अंतर होते. या १० ठिकाणी दोन्ही प्रमुख पक्षांना मिळालेली मते पाहता भाजपानेमध्य प्रदेशातील सत्ता अवघ्या साडेचार हजार मतांनी गमावल्याचे, तर काँग्रेसचे बहुमत फक्त २ हजार मतांनी हुकल्याचे दिसते.या १० पैकी ७ ठिकाणी भाजपा उमेदवारांना पराभूत करून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. भाजपासाठी धक्कादायक बाब म्हणजे, या सातही मतदारसंघांत मिळून विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक अवघ्या ४ हजार ३३७ मतांचा आहे. म्हणजे, या ठिकाणी सुमारे साडेचार हजारांच्या घरात मते भाजपाला मिळाली असती तर, या पक्षाला १०९ ऐवजी ११६ जागा म्हणजे काठावरचे बहुमत मिळून शिवराजसिंह यांनी विजयाचा चौकार लगावला असता.दुसरीकडे, १० पैकी ३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार भाजपा उमेवारांकडून एक हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले. त्याचा एकूण फरक १ हजार ८६३ मतांचा आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून काँग्रेस उमेवारांनी सुमारे २ हजार मते जादा घेतली असती तर त्यांच्या जागा ११४ वरून ११७ वर गेल्या असत्या. म्हणजे, या पक्षाने बहुमताला आवश्यक ११६ पेक्षा एक जागा जास्त जिंकली असती. मात्र, येथे दोन हजार मते कमी मिळाल्याने काँग्रेसचे बहुमत हुकले.दोन्ही पक्षांना ‘नोटा’चा फटकाज्या ७ ठिकाणी भाजपा उमेदवार एका हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा किती तरी जास्त मतदारांनी 'नोटा'चा पर्याय स्वीकारला.सातही ठिकाणी मिळून भाजपा उमेदवारांच्या पराभवाच्या अंतराची बेरीज ४,३३७ असताना तेथे तब्बल १४,३५८ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले.काँग्रेसलाही ‘नोटा’चा फटका बसला. ज्या ३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार एक हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले (एकूण बेरीज १८३३ मते), तेथे ४,७१२ मतदारांना विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करावे, इतपत पात्र उमेदवार कोणीच न वाटल्याने त्यांनी ‘नोटा’ला पसंती दिली.म्हणजेच, ज्या १० ठिकाणी एक हजारापेक्षा कमी मतांनी निकाल लागला तेथे ६,२०० मते निर्णायक ठरली. या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १९,०७० मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले....तर ‘टाय’ झाला असता१० मतदारसंघांतील जय-पराजयाचे अंतर बघता गमावलेल्या ७ ठिकाणी मिळून भाजपाने सुमारे साडेचार हजार मते घेतली असती आणि दुसरीकडे पराभूत झालेल्या ३ ठिकाणी मिळून काँग्रेसने सुमारे २ हजार मते घेतली असती, तर भाजपाने ११३ आणि काँग्रेसने ११० जागा जिंकल्या असत्या. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाही, असे निवडणुकीआधीच जाहीर करणाऱ्या बसपा (२) आणि सपा (१) यांनी काँग्रेसला साथ दिली असती तर ही निवडणूक टाय (प्रत्येकी ११३ जागा) झाली असती.२०१३पेक्षा भाजपाचा ‘वोट शेअर’ ३.८७ टक्क्यांनी घसरला२०१३ मध्ये भाजपाने शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली होती. तेव्हा भाजपाने एकूण मतदानाच्या ४४.८७ टक्के मतांसह तब्बल १६५ जागा जिंकल्या होत्या. ३६.३८ टक्के मते आणि जागा मात्र ५८ अशी निराशाजनक कामगिरी काँग्रेसने केली होती. २०१३च्या तुलनेत यंदा भाजपाला ४१ टक्के म्हणजे ३.८७ टक्के मते कमी मिळाली. जागा मात्र ५६ ने घटल्या. दुसरीकडे, २०१३ पेक्षा यंदा काँग्रेसने ४०.९ म्हणजे ४.५२ टक्के मते जादा घेतली. त्यांच्या जागांत ५६ने वाढ होऊन हा पक्ष सत्तेवर आला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपा