शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडून देशाबाहेरही आघाडीचा प्रयत्न- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:44 IST

भाजपानं मध्य प्रदेशमधून निवडणुकीच्या प्रचाराला एक प्रकारे सुरुवात केली आहे.

भोपाळ- भाजपानं मध्य प्रदेशमधून निवडणुकीच्या प्रचाराला एक प्रकारे सुरुवात केली आहे. महाकुंभ मेळाव्यातूननरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी कार्यकर्त्यांत उत्साह संचारण्याचा प्रयत्न केला आहे. हा भाजपाचा सर्वात मोठा मेळावा असल्याचा दावा मोदींनी केला आहे. यावेळी मोदींनी अमित शाहांच्या कामाचं कौतुकही केलं. मोदी म्हणाले, भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याचा गर्व आहे. स्वातंत्र्यानंतरही देश तीन महापुरुषांना कधीही विसरणार नाही, महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांना कधीही विसरणार नाही. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जीवन हे एक प्रेरणा आहे. आम्ही सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो. मतांच्या राजकारणामुळे देशाचं 70 वर्षांत नुकसान झालं.जेव्हा दिल्लीत यूपीएचं सरकार होतं. तेव्हा ज्या राज्यांत भाजपा सरकारं होती, त्या राज्यांतील जनतेला काँग्रेस शत्रू समजत होती. 10-10 वर्षं ज्यांनी मध्य प्रदेश राज्याला शत्रू समजलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे. काही लोकांनी मध्य प्रदेशला कायम प्रगतीपासून दूर ठेवलं. ज्या पक्षानं देशावर 50 ते 60 वर्षं शासन केलं, त्यांना मायक्रोस्कोप लावून आता शोधावं लागतंय. काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या अहंकारानंच त्यांचा पराभव केला आहे. खुर्चीवर काही जण स्वतः वडिलोपार्जित हक्क समजतात.आतासुद्धा काँग्रेस छोट्या छोट्या पक्षांच्या पाया पडत आहे. जर वेळीच काँग्रेस नेत्यांनी आत्मचिंतन केलं असतं तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती. आम्ही पैशानं नव्हे, तर जनतेच्या ताकदीनं निवडणुका लढतो. कार्यकर्त्यांनी माझं बूथ सर्वात मजबूत या उद्देशानं काम करावं. सव्वा कोटी देशवासीय हा भाजपाचा परिवार आहे. आम्ही पक्षाच्या आधी देशासंदर्भात विचार करतो. व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस ट्रिपल तलाकची प्रथा बंद करू इच्छित नाही. सव्वाशे वर्ष जुन्या पक्षात आता काही राहिलं नाही. काँग्रेस देशासाठी एक ओझं झालं आहे. शब्दकोशात अशी कोणतीही शिवी नाही, ज्याचा काँग्रेसनं माझ्याविरोधात वापर केला नाही. माझ्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडलेली नाही. परंतु जेवढे चिखलफेक करतील तेवढे कमळ फुलेल, असंही मोदी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा