भोपाळ - सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असतानाच कमलनाथ सरकारच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी गुरुवारी रात्री बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले. त्यामुळे आधीच अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे अवघड जाण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यावर त्यांच्यासोबत मध्य प्रदेश सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी पक्षाच्याविरोधात भूमिका घेत आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते. दरम्यान, मध्य प्रदेशात उदभवलेल्या राजकीय परिस्थिती प्रकरणी सर्वोच्च न्यायायात सुनावणी झाली. त्यात कमलनाथ सरकारला शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले होते.
मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले बंडखोर आमदारांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 00:09 IST
आधीच अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे अवघड जाण्याची शक्यता
मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले बंडखोर आमदारांचे राजीनामे
ठळक मुद्देमध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारलेअस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे अवघड जाण्याची शक्यता ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यावर त्यांच्यासोबत मध्य प्रदेश सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी पक्षाच्याविरोधात भूमिका घेत आपल्या पदांचे राजीनामे दिले होते