शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 08:45 IST

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद होते, ही बाब निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे. 

ठळक मुद्देभाजपाकडून EVMमध्ये छेडछाडीचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे तासभर होते बंद - निवडणूक आयोगस्टाँग रुमबाहेर निवडणूक आयोगाचा कडक पहारा तैनात

भोपाळ -  मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद होते, ही बाब निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे. याबाबत निवडणूक आयोगानं म्हटलंय की, सागरमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्णतः पार पडल्यानंतर दोन दिवसांनंतर ईव्हीएम जमा केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. भोपाळ आणि सागरमधील प्रकरण समोर आल्यानंतर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. 

(भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांना शंका)

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार 30 नोव्हेंबरला वीज पुरवठा खंडीत झाल्यानं स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एलईडी डिस्पले सकाळी 8.19 वाजल्यापासून ते सकाळी 9.35 वाजेपर्यंत बंद होते. या कारणामुळे कोणतेही रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. यानंतर एक अतिरिक्त एलईडी स्क्रीन, इनर्व्हटर आणि जेनरेटरची व्यवस्था करण्यात आली.  

निवडणूक आयोगाकडून असंही सांगण्यात आले आहे की, आता सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत आहेत आणि चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या उघडे ठेवण्यात आलेल्या एका दाराबाबतही काँग्रेसनं तक्रार केली होती. काँग्रेसच्या तक्राराची गांभीर्यानं दखल घेत हे दार तातडीनं बंद केले.  

(EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव)

जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, अशी भीती काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमवर कडेकोट पहारा द्यावा, अशी मागणी केली होती.  कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोपही ज्योतिरादित्य यांनी केला आहे.

''भाजपाला आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे लोकशाही आणि जनमत यांना पायदळी तुडवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. हा सरकारी संरक्षणाखाली लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करून ईव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असेही सिंधिया यांनी म्हटले होते.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश