शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सेबी प्रमुखांनी ICICI बँकेतून १७ कोटी रुपये सॅलरी घेतली, काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:22 IST

BIG claim by Congress on SEBI chief Madhabi Puri Buch : २०१७ ते २०२४ यादरम्यान माधबी यांनी आयसीआयसीआय बँकेतून जवळपास १६.८० कोटी रुपये सॅलरी घेतली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.   

BIG claim by Congress on SEBI chief Madhabi Puri Buch : नवी दिल्ली : सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर सोमवारी काँग्रेसकडून अनेक आरोप करण्यात आले. माधबी या २०१७ ते २०२१ पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. त्या २०२२ मध्ये सेबीच्या प्रमुख झाल्या. मात्र या काळात माधबी यांनी सेबी आणि आयसीआयसी बँकेकडून सॅलरी घेतली. २०१७ ते २०२४ यादरम्यान माधबी यांनी आयसीआयसीआय बँकेतून जवळपास १६.८० कोटी रुपये सॅलरी घेतली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.   

काँग्रेसने हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचे प्रकरण म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने केलेल्या या आरोपांवर माधबी पुरी बुच यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पत्रकार परिषदेत पवन खेरा यांनी सेबीच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केला आणि बाजार नियामकाने निःपक्षपातीपणा आणि स्वातंत्र्य राखले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

सेबीचे प्रमुख आयसीआयसीआय बँकेसारख्या खासगी संस्थेतून सॅलरी घेत असताना सेबीच्या निःपक्षपातीपणाची खात्री कशी करता येईल, असा सवाल पवन खेरा यांनी केला. तसेच, सेबीवर कोणताही 'बाह्य प्रभाव' नाही याची खात्री करण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असेही पवन खेरा यांनी म्हटले आहे.

"माधबी यांनी राजीनामा द्यावा"पवन खेरा म्हणाले, २०१७ ते २०२४ दरम्यान आयसीआयसीआय बँक कोट्यवधी रुपयांचे नियमित उत्पन्न घ्यायची आणि त्याच बँकेकडून ई-शॉपवरील टीडीएस देखील भरला जायचा जे सेबीच्या कलम ५४ चे थेट उल्लंघन आहे. त्यामुळे जर माधबी पुरी बुच यांना लाज वाटत असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

पवन खेरा यांनी पंतप्रधानांना विचारले प्रश्न?- सेबीची सदस्य होऊनही त्या आयसीआयसीआयकडून पगार घेत होत्या, हे पंतप्रधानांना माहीत होते का?-  आयसीआयसीआयच्या केसेस ऐकल्या जातात आणि तिथेच निर्णय घेतले जातात, हे पंतप्रधानांना माहीत आहे का?- आयसीआयसीआय सोडल्यानंतरही सेबी सदस्य किंवा प्रमुखांना फायदे का मिळत राहिले? टीडीएसही मिळत राहिला.- सेबी प्रमुख प्रकरण हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये उघडकीस आले, जे आज पुन्हा घडले, तर त्यांना कोण संरक्षण देत आहे? हे पंतप्रधानांनी सांगावे का?

हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये समोर आले होते नावगेल्या महिन्यात अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या प्रमुख माधबी पुरी-बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर कथित अदानी घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिसर्चने कागदपत्रांचा हवाला देत म्हटले होते की, बुच आणि त्यांच्या पतीचे एका ऑफशोअर फंडात हिस्सेदारी होती, ज्यात उद्योगपती गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते.

सेबी प्रमुखांनी आरोप फेटाळून लावले होतेहिंडेनबर्ग रिपोर्ट समोर आल्यानंतर सेबी प्रमुख माधबी पुरी-बुच आणि त्यांचे पती यांनी संयुक्त निवेदन जारी करून आरोप फेटाळून लावले होते. रिपोर्टमध्ये करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. यांत अजिबात तथ्य नाही. आपले जीवन आणि आर्थिक परिस्थिती खुल्या पुस्तकासारखी आहे, असे त्यांनी म्हटले होते.

कोण आहेत माधबी पुरी बुच?माधबी पुरी बुच यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणित विषयात पदवी घेतली आहे. सेबीच्या वेबसाइटनुसार, माधबी पुरी बुच २ मार्च २०२२ पासून सेबीच्या अध्यक्षा आहेत. माधबी पुरी यांनी ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्या म्हणून काम केले. या काळात माधबी यांच्याकडे बाजार नियमन विभाग, बाजार मध्यस्थ नियमन आणि पर्यवेक्षण विभागाची जबाबदारी होती. पूर्णवेळ सदस्य म्हणून, माधबी यांनी एकात्मिक देखरेख विभाग, गुंतवणूक व्यवस्थापन विभागासारखे अनेक महत्त्वाचे विभाग सांभाळले आहेत.

टॅग्स :SEBIसेबीcongressकाँग्रेसbusinessव्यवसायICICI Bankआयसीआयसीआय बँक