शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Lumpy Skin Disease: कोरोना-मंकीपॉक्सदरम्यान नवीन विषाणूचा धोका, 999 गायी-म्हशींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:29 IST

Lumpy Skin Disease in Gujarat: देशात कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका वाढत असतानाच एका एका नवीन विषाणूची एंट्री झाली आहे. जनावरामध्ये या धोकादायक विषाणूची लागण झपाट्याने होत आहे.

Lumpy Skin Disease in Gujarat: सध्या देशात कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्सचा धोका वाढला आहे. यातच आता गुजरातमध्ये एका नवीन विषाणूचे संकट आले आहे. हा नवीन विषाणू सध्यातरी जनावरांमध्ये झपाट्याने वाढत आहे. गुजरातचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी सांगितल्यानुसार, या नवीन विषाणूमुळे राज्यात आतापर्यंत 999 गुरांचा मृत्यू झाला आहे, यापैकी बहुतांश गायी आणि म्हशी आहेत.

14 जिल्ह्यांमध्ये पसरला व्हायरस गुजरात सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी सांगितले की, राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 'लम्पी स्किन डिसीज'चा प्रसार झाला आहे. आतापर्यंत हजारो जनावरांमध्ये हा रोग आढळून आला असून, 999 जनावरे दगावली आहेत. तसेच, 37 हजारांहून अधिक संक्रमित जनावरांवर उपचार सुरू आहेत.

पहिली केस कधी आढळलीगुजरात सरकारचे मंत्री राघवजी पटेल म्हणाले की, राज्यात या आजाराचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या आजारावर नियंत्रण मिळवले असल्याचेही त्यांनी सांगितले. पण, या आजाराचे पहिले प्रकरण नेमके कुठे आढळले, याची ठोस माहिती मिळू शकली नाही.

हा रोग जनावरांमध्ये कसा पसरतोलम्पी स्किन डिसीज हा एक रोग आहे जो डास, माश्या, उवा आणि कचऱ्यामुळे पसरतो. गुरांच्या थेट संपर्कात येऊन किंवा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे त्याचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे म्हणजे, ताप येणे, डोळे व नाकातून स्त्राव होणे, तोंडातून लाळ गळणे, संपूर्ण शरीरावर गुठळ्यांसारखे मऊ फोड येणे, दुधाचे उत्पादन कमी होणे आणि आहार घेण्यात त्रास होणे, यांचा समावेश होतो.

टॅग्स :Gujaratगुजरातcowगायcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य