शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लखनऊचे पोलीस आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह! नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी केली होती टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 23:13 IST

Lucknow Police Commissioner DK Thakur Corona Positive: कोरोनाच्या पहिल्या टेस्टिंगमध्ये पोलीस आयुक्त डीके ठाकूर पॉझिटिव्ह आढळले आहेत.

लखनऊ : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारतातही ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात आतापर्यंत 32 जणांना ओमायक्रॉन संसर्गाची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तर या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर कोरोना टेस्टिंग सुद्धा वाढण्यात आले आहे. यातच आता उत्तर प्रदेशातील लखनऊच्या पोलीस आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

कोरोनाच्या पहिल्या टेस्टिंगमध्ये पोलीस आयुक्त डीके ठाकूर पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर त्यांचे दुसरे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा रिपोर्ट म्हणजेच शनिवारी येणार आहे. तसेच, पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सुद्धा आता कोरोना टेस्ट केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. खरंतर, पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी प्रोटोकॉल अंतर्गत त्यांची  कोरोना टेस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये आयुक्त डीके ठाकूर यांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. सध्या ते त्यांच्या निवासस्थानी असून क्वारंटाईन आहेत. 

देशात आतापर्यंत 32 जणांना ओमायक्रॉनची लागणभारतात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ( Omicron variant) 32 रुग्ण आहेत. या रग्णांपैकी कोणत्याही रुग्णाला गंभीर लक्षणे नाहीत. यासंदर्भातील माहिती सरकारने शुक्रवारी दिली. राजस्थानमध्ये नऊ, गुजरातमध्ये तीन, महाराष्ट्रात 17, कर्नाटकात दोन आणि दिल्लीतील एका व्यक्तीमध्ये या संसर्गाची पुष्टी झाली आहे. याचबरोबर, शनिवारी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांची बैठक (Cabinet secretary Meeting on Omicron) देखील होणार आहे. या बैठकीत देशातील कोरोना विषाणूची ताजी परिस्थिती, आरोग्य सुविधा यावरही विचारमंथन केले जाणार आहे. 

59 देशांत ओमायक्रॉनचा प्रादुर्भावआरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन 53 देशांमध्ये पसरला आहे. 2936 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यूकेमध्ये 817, डेन्मार्कमध्ये 796 आणि दक्षिण आफ्रिकेत 431 मध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर कॅनडामध्ये 78, अमेरिकेत 71, जर्मनीमध्ये 65, दक्षिण कोरियामध्ये 60 जणांना ओमायक्रॉनची लागण झ्लायेच दिसून आले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या