GHMC Election : एआयएमआयएमच्या बालेकिल्ल्यात रोड शो करत योगी आदित्यनाथांचं ओवेसींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 19:54 IST2020-11-28T19:52:55+5:302020-11-28T19:54:00+5:30
आदित्यनाथांनी आज सायंकाळी हैदराबाद येथील मलकजगिरी भागात रोड शो केला. ते ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या 150 वॉर्डांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत.

GHMC Election : एआयएमआयएमच्या बालेकिल्ल्यात रोड शो करत योगी आदित्यनाथांचं ओवेसींना आव्हान
लखनौ - बिहार विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर आता भजपच्या नजरा तेलंगाणा आणि पश्चिम बंगालवर आहे. याची धुरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांभाळला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी शनिवारी तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये एक डिसेंबरला होणाऱ्या ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशनच्या निवडणूक प्रचारार्थ मलकजगिरी भागात रोड शो केला. योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी रोड शो तसेच जनसभा करण्यासाठी हैदराबादेत आहेत.
आदित्यनाथांनी आज सायंकाळी हैदराबाद येथील मलकजगिरी भागात रोड शो केला. ते ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या 150 वॉर्डांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांच्या या रोड शोमध्ये मोठी गरदी दिसून आली. योगिंच्या या निवडणूक प्रचाराकडे एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे.
ओवेसी यांनी या निवडणुकीसाठी येथे 51 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. हैदराबाद महापालिका निवडणुकीतही असदुद्दीन ओवेसी यांनी जुन्या हैदराबाद भागातही आपल्या पक्षाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यांपैकी पाच जागांवर हिंदू उमेदवार आहेत. ओवेसी यांचे साधारणपणे 10 टक्के उमेदवार हिंदू आहेत. ओवेसी यांनी हिंदू उमेदवारांना अशा भागात उभे केले आहे, जेथे हिंदू मुस्लीम लोकसंख्या जवळपास सारखीच असेल आणि तेथे विधानसभा जागेवरही एआयएमआयएमच्या आमदारांचा कब्जा आहे. मुख्यमंत्र योगी आदित्यनाथांनी जीदीमेतला येथे रोड शो केला. ते शाहली बांदा येथेही जनसभेला संबोधित कणार आहेत