शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकार 2.0!  नव्या मंत्र्यांसाठी 60 बंगले आणि 200 कार तयार, जाणून घ्या संपूर्ण तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 16:15 IST

उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या शपथविधीची तयारी लखनौच्या अटलबिहारी बाजपेयी एकना स्टेडियमवर सुरू आहे.

लखनौ-

उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या शपथविधीची तयारी लखनौच्या अटलबिहारी बाजपेयी एकना स्टेडियमवर सुरू आहे. तर दुसरीकडे शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांसाठी कार आणि बंगल्यांचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. बंगल्यांच्या सुशोभिकरणाचं काम पूर्ण झालं आहे. राज्याच्या मालमत्ता विभागानं नव्या मंत्र्यांसाठी मंत्री आवास तयार केले आहेत. राज्याच्या मालमत्ता विभागाकडे नेमके किती मंत्री शपथ घेणार याची माहिती नसली तरी उत्तर प्रदेश विधानसभेतील आमदारांच्या संख्येच्या आधारे एकूण ६० मंत्र्यांसाठी बंगले तयार करण्यात आले आहेत.

खरंतर सर्व ४०३ आमदारांना आमदार निवासाची व्यवस्था करण्यात येईलच. पण विद्यमान सरकारचे मंत्री अजूनही सरकारी आवासातच वास्तव्याला आहेत. मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळालं की संबंधित मंत्री आहे त्याच निवासस्थानात वास्तव्य करणार आहेत. याशिवाय कोणताही विद्यमान मंत्री पुन्हा मंत्रिमंडळाचा भाग बनला नाही तर त्याला १५ दिवसांत बंगला रिकामा करावा लागेल आणि तो बंगला दुसऱ्या कोणाला तरी दिला जाईल. नव्या मंत्र्यांसाठीही बंगले तयार करण्यात आले आहेत. ज्यांचं गरजेनुसार वाटप केलं जाईल. याशिवाय सुमारे २०० कार राज्याच्या मालमत्ता विभागानं सज्ज ठेवल्या आहेत. 

25 मार्च भव्य शपथविधी सोहळायोगी सरकारचा शपथविधी सोहळा भव्य दिव्य होण्यासाठी भाजपानं जोरदार तयारी केली आहे. एकना स्टेडियमवर सुमारे 70 हजार लोकांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनीही यासाठी पत्र जारी केलं आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असले तरी 24 मार्च रोजी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड होणार आहे. यासाठी केंद्रीय निरीक्षक गृहमंत्री अमित शहा आणि रघुवर दास 23 मार्चला लखनौला पोहोचणार आहेत. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२