मोदींनी तंबी देऊनही सर्जिकल स्ट्राईकवरुन लखनऊत पोस्टरबाजी
By Admin | Updated: October 11, 2016 10:06 IST2016-10-11T10:03:39+5:302016-10-11T10:06:18+5:30
सर्जिंकल स्ट्राईकवरुन छाती बडवून घेऊ नका अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली असतानाही लखनऊत पोस्टर्स लागलेले दिसत आहेत

मोदींनी तंबी देऊनही सर्जिकल स्ट्राईकवरुन लखनऊत पोस्टरबाजी
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 11 - सर्जिंकल स्ट्राईकवरुन उदो उदो करु नका अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली असतानाही लखनऊत पोस्टर्स लागलेले दिसत आहेत. नरेंद्र मोदी यावेळी लखनऊमध्ये दसरा साजरा करणार असून तेथील मैदानामध्येच हे पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि स्थानिक भाजपा नेत्यांचे फोटो आहेत. या पोस्टरवर उरी हल्ल्याचा बदला घेणा-याचं स्वागत असं लिहिण्यात आलं आहे.
भाजपाने मात्र आपण हे पोस्टर लावलं नसल्याचं सांगितलं आहे. हा राजकीय खेळ असल्याचा आरोप भाजपा नेते दिनेश शर्मा यांनी केला आहे.
सर्जिंकल स्ट्राईकचा भाजपा राजकीय फायदा उचलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी लष्कराच्या कारवाईचा पक्ष फायदा उचलणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र उत्तरप्रदेशातील निवडणुकीदरम्यान प्रचारात हा मुद्दा घेतला जाईल असंही सांगितलं आहे.