शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पूर्वेला ‘लुबान’, पश्चिमेला ‘तितली’; एकाचवेळी देशाभोवती दोन चक्रीवादळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 9:06 PM

पश्चिम भारतातील बहुतांश राज्यात अनेक ठिकाणी पाच दिवस पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज

पणजी: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे लुबान चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर बंगालच्या खाडीत आणखी एक ‘तितली’ चक्रीवादळ उठल्यामुळे हवामानासंबंधी संस्थांनी सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. पूर्व, मध्य, दक्षिण व पश्चिम भारतातील बहुतांश राज्यात अनेक ठिकाणी पाच दिवस पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.तासाला १०० ते ११० किलोमीटर वेगाने ओरिसा किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेले तितली चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झाले असून ११ ऑक्टोबरच्या पहाटे ते ओरिसाच्या गोलकपूर किनाऱ्याला ताशी ११० ते १२५ किलोमीटर आदळेल असा अंदाज हवामान खात्याच्या चक्रीवादळ विभागाने वर्तवला आहे. त्यापूर्वीचे तीन दिवस व त्या नंतरचे दोन दिवस म्हणजेच ५ दिवस या चक्रीवादळाचा परिणाम राहणार आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.  दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गतीही आता वाढून ताशी ११० किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. परंतु ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. गोव्यात काही ठिकाणी  रविवारी व सोमवारी पाऊस पडला होता. मंगळवारीही काही प्रमाणात पाऊस कोसळला. लुबान चक्रीवादळ भारतीय उपखंडापासून दूर जात आहे. तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरत आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली चक्रीवादळ अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. खोल समुद्रात न जाण्याचा इशाराचक्रीवादळांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना  ७४ किलोमीटरपेक्षा अधिक दूर न जाण्याचा इशारा तटरक्षक दलाने दिला आहे. एरव्ही ९ ऑक्टोबरपर्यंत हा इशारा मर्यादित होता. परंतु प्राप्त परिस्थितीत चक्रीवादळाची वाढलेली गती लक्षात घेता हा इशारा १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

टॅग्स :goaगोवाNatural Calamityनैसर्गिक आपत्ती