शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देशात LPG टंचाईचं संकट; पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक, काय ठरलं? कशी आहे देशाची स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:58 IST

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा रोखल्याने भारतसह अनेक आशियाई देशांत गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झाली आहे.

देशात सध्या एलपीजी सिलेंडर्सची टंचाई निर्माण होत असल्याच्या बातम्या आहेत. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 'एस्मा' (ESMA) लागू केला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही उपस्थित होते. खरेतर, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुले ही परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा रोखल्याने भारतसह अनेक आशियाई देशांत गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. घरगुती ग्राहकांना सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर - केंद्र सरकारचा मुख्य भर घरगुती ग्राहकांना सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर आहे. यासाठी औद्योगिक युनिट्स आणि व्यावसायिक सिलेंडर्सच्या पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. हॉटेल इंडस्ट्रीने या निर्णयावर आक्षेप घेतला असून, व्यावसायिक सिलेंडर्स न मिळाल्यास कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारताला होणारा बहुतांश तेल आणि गॅस पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो, यामुळे आगामी काही दिवस अत्यंत महत्वाचे असतील.

भारत आपल्या गरजेच्या एकूण एलपीजी पैकी ६२ टक्के आयात करतो -गॅस आणि तलाचा विचार करता, भारत आपल्या गरजेच्या एकूण एलपीजी पैकी ६२ टक्के आयात करतो. शिवाय, तेलावरील त्याचे अवलंबित्व जवळपास ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत, जर होर्मुझची सामुद्रधुनी जास्त काळ बंद राहिली तर संकट आणखी वाढेल.

देशाच्या एकूण एलपीजी वापरात घरगुती ग्राहकांचा वाटा ८७% -भारत सध्या त्याच्या गरजेच्या अंदाजे ८५% गॅस सौदी अरेबियाकडून खरेदी करतो. ही आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केली जाते, जी सध्या बंद आहे. संकट अधिकच गडद होत चालले आहे आणि सरकार सध्या पर्यायी पुरवठा मार्गांचा शोध घेत आहे. भारत दरवर्षी अंदाजे ३१.३ दशलक्ष टन एलपीजी वापरतो. देशाच्या एकूण एलपीजी वापरात घरगुती ग्राहकांचा वाटा ८७% आहे, त्यानंतर उद्योग, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचा वाटा १३% आहे. गॅसवरील वाढते अवलंबित्व पाहता, सरकारने 'एस्मा' लागू करून पुरवठ्याचे वर्गीकरण करत या समस्येला प्राधान्य दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Shortage Crisis in India: PM Modi Holds High-Level Meeting

Web Summary : India faces LPG shortages due to disruptions in Hormuz Strait. PM Modi convened a meeting, prioritizing domestic supply. Industrial and commercial cuts are implemented. India imports 62% of LPG, seeking alternative routes as the crisis deepens.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIranइराणCylinderगॅस सिलेंडरWarयुद्धAmericaअमेरिकाIsraelइस्रायल