शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

LPG Price Hike: गॅस दरवाढीचा भडका; किचन बजेट कोलमडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 06:03 IST

200 रुपयांची वाढ गेल्या वर्षभरात घरगुती गॅसच्या किमतीमध्ये झाली आहे. व्यावसायिक गॅस  सिलिंडरचे दरही चढेच

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची काेणतीही चिन्हे दिसत नाहीत. केंद्राने सर्वसामान्यांना घरगुती गॅस दरवाढीचा दणका दिला असून, महागाईच्या भडक्यात तेल ओतले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ सरकारने जाहीर केली. त्यामुळे देशातील जवळपास सर्वच ठिकाणी १४.२ किलाेच्या गॅस सिलिंडरसाठी एक हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम माेजावी लागणार आहे. 

गेल्या दाेन महिन्यामध्ये ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी २२ मार्चला इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविले हाेते. तर मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढविले हाेते. राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९९९.५० तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपये झाली आहे. 

किचन बजेट कोलमडणारn गेल्या काही दिवसापासून पेट्राेल आणि डिझेलच्या किमती उच्चांकी पातळीवर स्थिर आहेत. मात्र, सरकारने घरगुती गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांचा खिसा पुन्हा हलका केला आहे. n पेट्राेल आणि डिझेलपाठाेपाठ गॅसचे दरदेखील उच्चांकी पातळीवर आहेत. इंधनाच्या उच्चांकी दरामुळे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती महाग झाल्या आहेत. n त्यातच या दरवाढीमुळे जनतेचे बजेट काेलमडणार आहे. सर्वच स्तरातून गॅस दरवाढीवर नाराजी व्यक्त करण्यात येत असून, दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसची  सिलिंडरला ‘श्रद्धांजली’केंद्र सरकारने आजअचानकपणे घरगुती गैसच्या किंमतीत जवळपास ५० रुपयांची सरसकट केलेली वाढ मागे घ्यावी, या मागणीच्या समर्थनार्थ दिल्लीतील अकबर रोड येथील काँग्रेस कार्यालयात गैस सिलिंडरला हार अर्पण करून केंद्राच्या निर्णयाचा प्रतिकात्मक विरोध केला.

मोदी काळात सबसिडी बंदयूपीएच्या काळात घरगुती गैस सिलेंडरची किंमत ४१४ एवढी होती. मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात यात ५८५ रुपयांनी वाढ केली आहे. यूपीएच्या काळात सिलेंडरवर ४६,४५८ कोटी रुपये सबसिडी दिली जात होती. आता मोदी सरकारने संपूर्ण सबसिडी बंद केली आहे. गरीब व मध्यमवर्गीयांना ४१४ रुपयांमध्ये सिलेंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खेडा यांनी यावेळी केली.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर