शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
2
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
4
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
5
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
6
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
7
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
8
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
9
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
10
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
11
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
12
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
13
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
14
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
15
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
16
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
17
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
18
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
19
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
20
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?

३१ जानेवारीपर्यंत मोफत मिळणार LPG सिलिंडर; पाहा कुठे मिळतेय ही ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 11:21 IST

पाहा कसा घेता येऊ शकेल या ऑफरचा लाभ?

ठळक मुद्दे३१ जानेवारीपर्यंतच मिळणार याऑफरचा लाभकॅशबॅकच्या रूपात मिळू शकते संपूर्ण रक्कम

एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ जानेवारीपर्यंत ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मोफत मिळू शकतो. या ऑफर अंतर्गत एलपीजी सिलिंडर बुक केल्यास ग्राहकांना त्यांचे संपूर्ण पैसे परत केले जाणार आहेत. या विशेष ऑफर अंतर्गत सिलिंडरची किंमत जेवढी असेल तेवढे पैसे त्या ग्राहकाला परत केले जाणार आहे. मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म पेटीएम आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहे. या ऑफिर अंतर्गत ग्राहकांना पेटीएमद्वारे आपला एलपीजी सिलिंडर बुक करावा लागेल. ही ऑफर सर्वच कंपन्यांच्या सिलिंडरवर लागू आहे. जे ग्राहक पहिल्यांदाच पेटीएमचा वापर करत आहेत, अशा ग्राहकांनाच या सुविधेचा फायदा मिळणार आहे. कसा घ्याल लाभ?या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाच्या मोबाईलमध्ये Paytm अॅप असणं आवश्यक आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप नसेल तर ते डाऊनलोड करा. यानंतर त्या ठिकाणी दिलेल्या ऑप्शनमधून सिलिंडर बुक करा. पेटीएममधून एलपीजी सिलिंडर बुक केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ७०० रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. याचाच अर्थ सिलिंडरसाठी देण्यात येणारी संपूर्ण रक्कम कॅशबॅकच्या रूपात मिळण्याची शक्यता आहे. सध्या दिल्लीत १४.२ किलोच्या अनुदानीत सिलिंडरची किंमत ६९४ रूपये आहे. पेटीएमच्या या ऑफरचा लाभ तेव्हाच घेता येऊ शकेल जेव्हा बुकींग अमाऊंट ५०० रूपये किंवा त्याच्यावर असेल. तसंच ३१ जानेवारीपर्यंत ही ऑफर सुरू राहणार आहे. ज्यावेळी ग्राहक याची रक्कम भरेल त्यानंतर त्याला एक स्क्रॅच कुपन देण्यात येईल. २४ तासांच्या आत हे कुपन ग्राहकांना मिळणार आहे. ७ दिवसांच्या आत हे कुपन ग्राहकांना उघडावं लागेल. त्यानंतर यातील रक्कम ग्राहकांना कॅशबॅकच्या रूपात मिळेल. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरdelhiदिल्लीPaytmपे-टीएमonlineऑनलाइनMONEYपैसा