शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

LPG घेऊन आज पहिला टँकर 'शिवालिक', उद्या 'नंदादेवी' येणार! ९२,७०० टन गॅस किती दिवस पुरणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:47 IST

LPG Supply Calculation: 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे— 'शिवालिक' आणि 'नंदादेवी'— इराणच्या किनारपट्टीवरील धोकादायक 'होर्मुझची सामुद्रधुनी' यशस्वीरित्या ओलांडून भारताच्या वेशीवर आली आहेत.

पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर निर्माण झालेले संकट काही अंशी कमी झाले आहे. 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे— 'शिवालिक' आणि 'नंदादेवी'— इराणच्या किनारपट्टीवरील धोकादायक 'होर्मुझची सामुद्रधुनी' यशस्वीरित्या ओलांडून भारताच्या वेशीवर आली आहेत. आज शिवालिक भारतीय बंदरावर पोहोचणार असून उद्या नंदादेवी टँकर पोहोचणार आहे. हा गॅस भारताला किती दिवस पुरणार असा सवाल उपस्थित होत आहे. 

या दोन जहाजांवर मिळून सुमारे ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. प्रत्येक जहाजावर ४६,००० टनांहून अधिक गॅस असून, तो देशाच्या घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शिवालिक हे जहाज १६ मार्च २०२६ रोजी (आज) गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. नंदादेवी हे जहाज १७ मार्च २०२६ रोजी कांडला बंदरात दाखल होईल.

किती दिवसांची गरज पूर्ण होणार?भारताच्या एकूण गॅस आयातीपैकी ९०% आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. तज्ज्ञांच्या मते, भारतामध्ये दररोज सुमारे ८०,००० टन एलपीजीचा वापर होतो. दररोज सुमारे ७५ लाख सिलेंडर वापरले जातात. एकूण गॅसपैकी ८५% सिलेंडर स्वयंपाकासाठी (घरगुती) वापरले जातात. भारतात ३३ कोटी एलपीजी ग्राहक आहेत. या ९२,७०० टन गॅसमुळे देशातील सुमारे सव्वा दिवसाची अतिरिक्त गरज पूर्ण होऊ शकते. युद्धाच्या काळात जेव्हा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, तेव्हा हा सव्वा दिवसाचा साठाही भारतीय स्वयंपाकघरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.  

शिवालिक' आणि 'नंदादेवी' ही दोन जहाजे सुरक्षित बाहेर पडल्यानंतर, आता होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेले ६ एलपीजी आणि १ एलएनजी टँकर भारतात आणण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. होर्मुझच्या पाण्यावर सध्या भारताची २२ जहाजे उभी असून त्यावर ६११ भारतीय खलाशी आहेत. भारत प्रामुख्याने कतार, कुवेत आणि सौदी अरेबियाकडून गॅस आयात करतो. हे गॅस टँकर्स सध्या इराणच्या लष्करी देखरेखीखाली असलेल्या भागात आहेत. परंतू, ते भारताचे आहेत म्हणून इराणने सोडण्याची परवानगी दिली आहे. 

भारताचे कूटनीतिक प्रयत्नभारत सरकार आणि इराणमध्ये सध्या उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. जर हे ६ टँकर्स सुरक्षितपणे भारताच्या दिशेने निघाले, तर देशातील गॅस साठ्यात मोठी वाढ होईल आणि युद्धाच्या काळात निर्माण झालेली टंचाईची भीती दूर होईल. भारताने 'युआन'मध्ये पेमेंट स्वीकारण्याबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, परंतु जहाजांच्या सुरक्षिततेसाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पॅनिक बुकिंग टाळण्याचे आवाहनपेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशात पुरेसा गॅस साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून 'पॅनिक बुकिंग' करू नये आणि केवळ आवश्यक असेल तरच सिलिंडर बुक करावा, असे आवाहन सहसचिव सुजाता शर्मा यांनी केले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये छापेमारीही सुरू करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Tankers Arrive, Boosting India's Gas Reserves Amidst Global Uncertainty

Web Summary : Two LPG tankers reached India, carrying 92,700 tons of gas. This supply can cover about 1.25 days of national demand, providing relief amidst global supply chain disruptions. Efforts are underway to secure more stranded tankers.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईIranइराणWarयुद्धUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर