शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कामाप्रती निष्ठा... जीवाची बाजी लावून विहिरीत अडकलेल्या बिबट्याला दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 17:05 IST

भारतीय वन विभागातील सनदी अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिद्दराजू यांच्या धाडसी कामाचा फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्दे भारतीय वन विभागातील सनदी अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिद्दराजू यांच्या धाडसी कामाचा फोटो शेअर केला आहे.सिद्दराजू यांनी एका लोखंडी पिंजऱ्यात स्वत:ला बंद करुन घेतले. तसेच, आपल्या एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन ते विहिरीत उतरले.

बंगळुरू - कर्नाटकच्या नगरहोल राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील एका वन अधिकाऱ्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, एका आएफएस अधिकाऱ्यानेही त्यांच्या कामाचं कौतुक करताना, आपल्या कामाप्रती अशी निष्ठा असावी, असा संदेशच दिला आहे. सिद्धराजू नावाच्या वन अधिकाऱ्याने 100 फुटी खोल विहिरीत उतरुन बिबट्याचे प्राण वाचवले. 

भारतीय वन विभागातील सनदी अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिद्दराजू यांच्या धाडसी कामाचा फोटो शेअर केला आहे. नगरहोल येथे रेंजर फॉरेस्ट ऑफिसर असलेल्या सिद्दराजू यांनी एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान दिलं. आपल्या जीवाची बाजी लावून ते एका पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीत उतरले होते. 100 फुट खोल असलेल्या या कोरड्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. त्याला वाचविण्यासाठी सिद्दराजू यांनी शर्थीचे प्रयत्न केले.  सिद्दराजू यांनी एका लोखंडी पिंजऱ्यात स्वत:ला बंद करुन घेतले. तसेच, आपल्या एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन ते विहिरीत उतरले. त्यानंतर, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला त्यांनी जीवनदान दिलं. या बिबट्याला बाहेर काढण्यात वन खात्याला यश आले. मात्र, आपल्या कामाप्रति निष्ठा व तळमळ सिद्दराजू यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचं सनदी अधिकारी परवीन कासवान (आयएफएश) यांनी म्हटलंय. कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील दोन फोटोही शेअर केले आहेत.  

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगलforest departmentवनविभागTwitterट्विटर