स्कॉर्पिओच्या काचा बंद करून आत चाळे करत बसले लव्हर्स; तितक्यात ट्रॅफिक पोलीस तिथे पोहोचला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:04 IST2024-02-02T12:04:15+5:302024-02-02T12:04:43+5:30

मोतीझील ओव्हरब्रिजवर एक स्कॉर्पिओ अनधिकृतपणे पार्क केली होती. त्याला ट्रॅफिक पोलिसांनी इथे थांबू नका असे सांगून ते निघाले होते.

Lovers sitting inside with Scorpio's windows closed doing roamnce in Bihar Overbridge; Meanwhile, the traffic police reached there... | स्कॉर्पिओच्या काचा बंद करून आत चाळे करत बसले लव्हर्स; तितक्यात ट्रॅफिक पोलीस तिथे पोहोचला...

स्कॉर्पिओच्या काचा बंद करून आत चाळे करत बसले लव्हर्स; तितक्यात ट्रॅफिक पोलीस तिथे पोहोचला...

अनेकदा प्रेमी युगुलांना कारमध्ये बसून चाळे करताना तुम्ही पाहिले असेल. काही हौशी त्यांना पकडतात, धिंड काढतात किंवा त्यांच्या पालकांना बोलावतात. पण सरकारची गाडी असा बोर्ड लावून कोणी कारमध्ये बसून चाळे करत असाल तर काय कराल? बिहारच्या ट्रॅफिक पोलिसाने अशा प्रेमी युगुलाला चांगलाच धडा शिकविला आहे. 

मोतीझील ओव्हरब्रिजवर एक स्कॉर्पिओ अनधिकृतपणे पार्क केली होती. त्याला ट्रॅफिक पोलिसांनी इथे थांबू नका असे सांगून ते निघाले होते. पोलीस जाताच आतील प्रेमी युगुलाने स्कॉर्पियोच्या काचा बंद केल्या होत्या आणि आतमध्ये अश्लील चाळे सुरु केले होते. थोड्या वेळाने पुन्हा तिथे ट्रॅफिक पोलीस आला आणि त्याने काचेवर टकटक केले. आत पाहिले असता एक तरुण आणि तरुणी विवस्त्र अवस्थेत होते. 

या ट्रॅफिक पोलिसाने आपल्या वरिष्ठांना फोन करून माहिती दिली आणि बोलवून घेतले. पोलिसांनी अनधिकृत पार्किंग केल्यावरून चालकाला २५०० रुपयांचे चलन दिले. तसेच गाडीही हटविली. 

या तरुणाने तो विभागिय अधिकारी असल्याचे पोलिसांना सांगत तिथेच गाडी पार्क केली होती. वाहतूक कोंडी होऊ लागली म्हणून पुन्हा पोलीस तिथे आले होते. तेव्हा आतमध्ये चाललेले या विभागिय अधिकाऱ्याचे चाळे पोलिसांच्या निदर्शनास आले. 
 

Web Title: Lovers sitting inside with Scorpio's windows closed doing roamnce in Bihar Overbridge; Meanwhile, the traffic police reached there...

टॅग्स :Biharबिहार