शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

Love Story : 10वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहोचला स्वित्झर्लंडला! फिल्मी आहे संपूर्ण स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 15:59 IST

कुणाचं नशीब कधी आणि कशी कलाटणी घेईल, कुणीच सांगू शकत नाही. काहीशी अशीच आहे, राजस्थानातील जयपूर येथील रंजीत सिंह राज यांची स्टोरी...

कुणाचं नशीब कधी आणि कशी कलाटणी घेईल, कुणीच सांगू शकत नाही. राजस्थानातील जयपूर येथील रंजीत सिंह राज (Ranjit Singh Raj) यांची कहाणीही काहीशी अशीच आहे. आज ते स्वित्झर्लंडमध्ये राहतात. मात्र, इथवर पोहोचण्यामागे त्यांच्या प्रेमाचा मोठा हात आहे. 

एक गरीब कुटुंबात झाला जन्म -राज यांनी लहानपणापासूनच कष्ट केले. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. ते सांगतात, ‘मी 10वीच्या वर्गात नापास झालो होतो. अभ्यासातही कच्चाच होतो. माझ्या पालकांनी मला काही तरी बनण्यासाठी शाळेत पाठवले होते. कुणालाही माझ्या क्रिएटिव्हिटी आणि कल्पनांशी काही एक देणे-घेणे नव्हते.’ 

16 वर्षांचे होते, तेव्हाच ते शिक्षण सोडून ऑटोरिक्शा चालवायला लागले. त्यांनी अनेक वर्ष जयपूर येथेच ऑटोरिक्षा चालवली. याचवेळी त्यांच्या लक्षात आले, की टुरिस्टला इंप्रेस करण्यासाठी ऑटो ड्रायव्हर्स इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि इतर भाषा बोलतात. यानंतर त्यांनीही इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात केली. राज सांगतात, ‘2008 मध्ये जग आयटी क्षेत्राकडे धावत असताना, माझी इंग्रजी शिकण्याची इच्छा होती. यानंतर त्यांनी टुरिझमचा उद्योग सुरू केला. ते परदेशातील लोकांना राजस्थान फिरवत होते.

कमाल! नवरदेवाचं नाव समाजवाद अन् नवरीचं 'ममता बॅनर्जी', तामिळनाडूतील अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा!

येथेच पहिल्यांदा झाली प्रेयसीची भेट - याच वेळी एका मुलीशी त्यांची भेट झाली. ही मुलगी त्यांची क्लायंट होती. ती भारत भ्रमणासाठी आली होती. राज स्वतःच त्यांना जयपूर दाखवत होते. ‘आम्ही पहिल्यांदा सीटी पॅलेसमध्ये भेटलो. ती तीच्या एका मैत्रिणीसोबत आली होती. आम्ही दोघे एक-मेकांना आवडू लागलो आणि आमचे बोलणे सुरू झाले. यानंतर ती फ्रान्सला निघून गेली. आम्ही दोघेही Skype वरून बोलत होतो. यानंतर आम्ही दोघे प्रेमात आहोत, याची जाणीव आम्हाला झाली.’

अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला -राज यांनी सांगितले, मी अनेक वेळा तिला भेटण्यासाठी फ्रान्सला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी त्याचा व्हिसा रिडेक्ट होत होता. एवढ्या वेळा व्हिसा रिजेक्ट होऊनही आमचे नाते कायम होते. मग आम्ही दोघे फ्रान्स दुतावासासमोर उपोषणाला बसलो. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना तीन महिन्यांचा व्हिसा देण्यात आला.’

Corona Vaccination: कोरोना लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्ती केंद्रावर पोहचले; आधार कार्डावरील वय पाहून सगळेच चक्रावले

2014 त केलं लग्न -राज यांनी 2014 मध्ये लग्न केले. एका वर्षानंतर दोघांना एक मुलगा झाला. यानंतर राजने लाँग टर्म व्हिसासाठी अर्ज केला. त्यांना फेन्च भाषा शिकावी लागली. आज राज आपली पत्नी आणि मुलासह जेनेव्हा येथे राहतात. ते रेस्टोरन्टमध्ये काम करतात. लवकरच स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे.

 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRajasthanराजस्थानSwitzerlandस्वित्झर्लंडFranceफ्रान्स