Corona Vaccination: कोरोना लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्ती केंद्रावर पोहचले; आधार कार्डावरील वय पाहून सगळेच चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:16 AM2021-06-10T10:16:16+5:302021-06-10T10:17:35+5:30

वृद्ध लोकही कोरोना लसीकरणात हिरारीने सहभाग घेताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीचे डोस वेळेवर घेतले जात आहेत.

Corona Vaccination: Swami Shivanand World Oldest Person Got The Corona Vaccine In Varanasi | Corona Vaccination: कोरोना लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्ती केंद्रावर पोहचले; आधार कार्डावरील वय पाहून सगळेच चक्रावले

Corona Vaccination: कोरोना लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्ती केंद्रावर पोहचले; आधार कार्डावरील वय पाहून सगळेच चक्रावले

googlenewsNext
ठळक मुद्देवाराणसीत एका लसीकरण केंद्रावर वृद्ध व्यक्ती लस घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्या व्यक्तीचं आधार कार्ड पाहिलं असता सगळं चक्रावले. स्वामी शिवानंद हे भेलपूर क्षेत्रातील कबीर नगर परिसरात राहतात. शिवानंद यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. स्वामी शिवानंद यांचा दिनक्रम पाहिला तर त्यांचा मुकाबला कोणताही तरूण करू शकत नाही

वाराणसी – देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम वेगाने होत आहे. १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येत आहे. विशेषत: वृद्ध लोकांना लसीकरण मोहिमेत समाविष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कोरोना महामारीचा सर्वाधिक धोका वृद्ध व्यक्तींना आहे. त्यामुळे या वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

वृद्ध लोकही कोरोना लसीकरणात हिरारीने सहभाग घेताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीचे डोस वेळेवर घेतले जात आहेत. वाराणसीत एका लसीकरण केंद्रावर वृद्ध व्यक्ती लस घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्या व्यक्तीचं आधार कार्ड पाहिलं असता सगळं चक्रावले. या व्यक्तीचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी झाला आहे. म्हणजे जवळपास १२५ वय असलेले वृद्ध कोरोना लस घेण्यासाठी आल्यानं सगळेच आश्चर्यचकीत झाले. या वृद्ध व्यक्तीच नाव स्वामी शिवानंद आहे.

स्वामी शिवानंद हे भेलपूर क्षेत्रातील कबीर नगर परिसरात राहतात. शिवानंद यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. दुर्गाकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आधार कार्डच्या आधारे वॉक इन रजिस्ट्रेशन करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वामी शिवानंद यांचं लसीकरण केले. शिवानंद नेहमी काशीच्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. १२५ वय असूनही आजही शिवानंद खूप सक्रीय असतात. कोणाच्या मदतीविना ते स्वत:चं काम स्वत: करतात.

लोकांचे म्हणणं आहे की, स्वामी शिवानंद यांचा दिनक्रम पाहिला तर त्यांचा मुकाबला कोणताही तरूण करू शकत नाही. बांगलादेशच्या श्रीहट्ट येथे जन्मलेले स्वामी शिवानंद पहाटे ३ ला उठतात आणि गंगा स्नान करून योग करतात. शिवानंद सांगतात की, ते साधं जेवण करतात. तेल, मसाला अशा पदार्थापासून दूर राहतात. भाजी, डाळ असंच खातात. त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. ते गरीब कुटुंबात जन्माला आले होते. त्यांच्या आईवडिलांचा भूकेने मृत्यू झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत ते अर्धपोट जेवण करतात.

२१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत कोरोना लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशात आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी देखील केंद्र सरकार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. यासाठी पुढील दोन आठवड्यांमध्ये केंद्र आणि राज्यांच्या समन्वयातून तयारी केली जाणार आहे. त्यानंतर २१ जूनपासून देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार आहे. "२१ जून रोजी योग दिनाचं औचित्य साधून देशात मोफत लसीकरण मोहीम सुरू होईल. यात १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत केलं जाणार आहे. राज्य सरकारांना लसीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही असं मोदी म्हणाले होते.

Web Title: Corona Vaccination: Swami Shivanand World Oldest Person Got The Corona Vaccine In Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.